मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नुकतेच राज्य सरकार मुंबई येथे १००० बेडची व्यवस्था असणारे रुग्णालय उभारत असल्याचेही बोलले जात आहे. अशात आता मुंबईच्या सायन हाॅस्पिटलमध्ये डॅड बाॅडींच्या सोबत रुग्णांना झोपावे लागत असल्याची तक्रार भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर करुन रुग्णांना डॅड बाॅडींसोबत झोपायला लागत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यात खाजगी डाॅक्टरांनी आपली प्रेक्टिस बंद केल्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात अधिकाधिक ICU बेड्स उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र आता राणे यांनी शेयर केलेल्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Patients sleeping along dead bodies @ Sion hospital pic.twitter.com/DFylWcMq9N
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 6, 2020
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर त्याचा मोठा ताण पडलेला आहे. सरकारी पातळीवर याआधी आरोग्यावर मोठा खर्च न केल्याने त्याचा फटका आता आपल्या सर्वांना बसल आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता आरोग्य व्यवस्था अजून मजबूत करणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.