मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज सर्व कुटुबीयांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी रणजीतसिंहांनी केलेले भाषण ऐकण्यासाठी शरद पवार यांनी बैठक थांबविली.
धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी माढा मतदार संघातील उमेदवारी ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली होती. मात्र त्याच दरम्यान मुंबई वानखेडे येथे आयोजित रणजितसिंह यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम चालू होता. रणजितसिंह यांचे भाषण सुरु झाल्यावर शरद पवार यांनी ते भाषण ऐकण्यासाठी बैठक थोडा वेळ थांबवली होती. शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी हे संपूर्ण भाषण ऐकले. भाषण संपल्यावर पुन्हा माढा मतदारसंघाच्या बैठकीला सुरुवात झाली.
यावेळी बोलताना २० वर्षे राष्ट्रवादीमध्ये विविध पदे उपभोगलेले रणजितसिंह हे आपल्या भाषणात भाजपाचे गोडवे गाताना दिसले. राष्ट्रवादीत घुसमट होत नसल्यानं नव्हे तर मोदींनी केलेल्या विकासामुळेच भाजपात प्रवेश करत असल्याचे रणजितसिंहांनी यावेळ सांगितले. मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे मोठं घराणं भाजपसोबत जोडत आहे याचा मोठा आनंद आहे’ तसेच ‘पुढचा माढाचा खासदार भाजपाचाच असेल’ असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाचे –
रणजीतसिंह मोहिते पाटिलांनंतर राष्ट्रवादीच्या या माजी खासदाराच्या मुलाचा भाजप प्रवेश
बैलाच्या मृत्यूने कुटुंबीय हेलावले ; लाडक्या राजाचा दशक्रिया विधी सर्वत्र चर्चेत
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहितेंचा भाजप प्रवेश