हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | LIC कडून नागरिकांसाठी अनेक योजनांची ऑफर दिली जाते. आपल्याला आपण घेतलेल्या पॉलिसीचा प्रीमियम भरावा लागतो. यासाठी एलआयसीच्या ऑफिसला जावे लागते. मात्र जर आपल्याला LIC च्या थेट शाखेत जाऊन प्रीमियम भरणे अवघड वाटत असेल तर आता आपल्याला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण आता एलआयसीकडून पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी काही ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. चला तर मग एलआयसी पॉलिसीचा प्रीमियम घरबसल्या जमा करण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात…
आता पॉलिसीधारकांना LIC Pay Direct अॅप किंवा एलआयसी वेबसाइट व्यतिरिक्त, पेटीएम, फोनपे किंवा गुगलपे, अॅमेझॉन सारख्या पेमेंट अॅप्सद्वारे घरबसल्या प्रीमियम जमा करता येईल. हे जाणून घ्या कि, एलआयसीच्या वेबसाइटवरून प्रीमियम जमा करण्यासाठी, सर्वांत आधी http://www.licindia.in वर जावे लागेल. यानंतर, ‘Pay Direct’ असे लिहिलेले दिसेल जेथे लॉगिन न करताही प्रीमियम भरता येईल.
पेटीएमद्वारे अशा प्रकारे भरा एलआयसी प्रीमियम
>> सर्वात आधी पेटीएम अॅप उघडा.
>> यानंतर एलआयसी इंडियाच्या पर्यायावर क्लिक करा.
>> यानंतर एलआयसी पॉलिसी क्रमांक भरावा लागेल, त्यानंतर उर्वरित तपशील आपोआप येतील.
>> आता Proceed For Payment च्या पर्यायावर क्लिक करा.
>> आता पेमेंट पर्याय निवडा. यानंतर आपला प्रीमियम जमा केला जाईल.
PhonePe द्वारे अशा प्रकारे भरा एलआयसी प्रीमियम
>> सर्वात आधी PhonePe अॅप उघडा.
>> विमा प्रीमियम भरण्याचा पर्यायावर क्लिक करा.
>> एलआयसी प्रीमियम पेमेंट पर्याय निवडा. LIC नंबर आणि ईमेल आयडी एंटर करा आणि कन्फर्म बटण दाबा.
>> आता पेमेंट पर्याय निवडा. यानंतर आपला प्रीमियम जमा केला जाईल.
हे पण वाचा :
118 वर्षे जुन्या City Union Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, पहा नवीन व्याजदर
‘या’ Tax Saving Scheme मध्ये गुंतवणूक करून मिळवा कर सवलत !!!
विमानातील लघवीप्रकरणी Air India ला 30 लाखांचा दंड, DGCA ची मोठी कारवाई
Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्या करोडो लोकांसमोर उभे नवीन संकट, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Kisan Credit Card म्हणजे काय ??? याद्वारे अशा प्रकारे मिळवा स्वस्त दरात कर्ज !!!