हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG : गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढते आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या वस्तूंच्या किमतींमध्ये देखील जोरदार वाढ झाली आहे. अशातच आता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणेही महागले आहे. 16 जूनपासून नवीन दर लागू करण्यात येणार आहेत.
एका मीडिया रिपोर्टनुसार, 14.2 किलोच्या LPG सिलेंडरची सिक्योरिटी अमाउंट 750 रुपयांनी वाढवली आहे. आता पाच किलोच्या सिलेंडरसाठीही 350 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. तसेच आता गॅस रेग्युलेटरच्या किमतीतही 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अशातच आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना देखील दुसऱ्या सिलेंडरसाठी वाढीव रक्कम द्यावी लागेल.
ग्राहकाला आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी 2,200 रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी ही रक्कम 1450 रुपये होती. अशाप्रकारे आता सिलेंडरची सिक्योरिटी म्हणून 750 रुपये जास्त जमा करावे लागणार आहेत. याशिवाय रेग्युलेटरसाठी 250, पासबुकसाठी 25 आणि पाईपसाठी 150 रुपये देखील वेगळे द्यावे लागतील. त्यानुसार आता नवीन गॅस सिलेंडर कनेक्शन आणि पहिल्या सिलेंडरसाठी ग्राहकाला एकूण 3,690 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
घरगुती पेट्रोलियम कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आता पाच किलोच्या LPG सिलेंडरसाठी 800 रुपयांऐवजी 1150 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांनाही झटका बसणार आहे. या योजनेतील ग्राहकांनी जर दुसरा सिलेंडर घेतला तर त्यांना वाढीव रक्कम भरावी लागेल. तसेच आता ग्राहकांना नवीन रेग्युलेटरसाठीही 150 रुपयांऐवजी 250 रुपये द्यावे लागतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/lpg-price.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे नवीन दर पहा
Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!
Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!
axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतील हे जाणून घ्या