हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु असून भारताने विश्वचषकात सलग आठ सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. त्याच दरम्यान, सध्या सुपर फॉर्मात असणारा भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला थेट एका अभिनेत्रीने लग्नाची मागणी घातली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
कोणी घातली मागणी?
हिंदी आणि तेलगू चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पायल घोषणे क्रिकेटर शमीला लग्नासाठी मागणी घातली आहे. सोशल मीडिया वर तिने पोस्ट करत आपल्याला भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र असं जरी असलं तरी पायलने यासाठी एक ठेवली आहे. ती म्हणते ‘शमी तू इंग्रजी सुधार मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.’ अशी अट ठेवत तिने शमीला प्रपोज केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा रंगताना दिसून येत आहे .
#Shami Tum apna English sudharlo, I’m ready to marry you 🤣🤣
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) November 2, 2023
वर्ल्डकप मध्ये शमीने घेतल्या 16 विकेट्स
न्यूझीलँड आणि श्रीलंकेच्या सामना हा सर्वांच्याच लक्षात आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे वर्ल्डकप मध्ये शमीने एकूण 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याची वाहवाह ही जगभर होताना दिसून येत आहे. आता साखळी फेरीतील शेवटच्या राऊंडला येऊन पोहचले आहे. आणि यात भारताची टक्कर नेदरलँड सोबत 12 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी होणार असून त्याबाबत सर्वांचजण उत्सुक आहेत. असे असताना आता शमी आपली कामगिरी कशी पार पडतो. याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मोहम्मद शमीचे यापूर्वी एक लग्न झालं होते. परंतु काही महिन्यांपूर्वीच त्याची आधीची पत्नी हसीन जहानबरोबर घटस्फोट झाला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी हसीनने शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. परंतु, हे सगळे आरोप शमीने फेटाळून लावले आहेत. हसिनने केलेल्या आरोपामुळे शमीच्या करिअरवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होते. परंतु अखेर त्या परिस्थितून बाहेर पडत शमी पुन्हा एकदा भारतीय संघासाठी दमदार कामगिरी करताना दिसत आहे.