हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यूपीआय लाईट (UPI Lite) संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे आपल्याला यूपी लाईटवरून दोनशे किंवा पाचशे रुपयांचे पेमेंट विना इंटरनेटशिवाय करता येणार आहे. इथून पुढे यूपीआय लाईट वरून 200 किंवा 500 पर्यंतचे किरकोळ पेमेंट करण्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज भासणार नाही. हा निर्णय आरबीआयने डिजिटल पेमेंटचा आवाका वाढवण्यासाठी घेतला आहे. तसेच यामुळे आरबीआयमध्ये ग्राहकांची गुंतवणूक वाढेल असा हेतू हा निर्णय घेण्यामागे ठेवण्यात आला आहे.
गुरुवारी शक्तिदास यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी म्हटले आहे की, डिजिटल पेमेंटचा अनुभव सुधारण्यासाठी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच AI कृत्रिम बुद्धिमत्ता सिस्टीमला जोडण्यास आणि वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यास मदत मदत करेल. विशेष म्हणजे इथून पुढे आरबीआय जवळच्या फिल्ड कम्युनिकेशनचा वापर करून यूपीआय लाईटला (UPI Lite) परवानगी देणार आहे. कंपनीने घेतलेला हा निर्णय भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वास शक्तीदास यांनी व्यक्त केला आहे.
UPI Lite म्हणजे काय?
UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस होय. यावरून पेमेंट करण्यासाठी सर्वसाधारणपणे इंटरनेटची गरज असते. परंतु UPI Lite वापर करताना इंटरनेट नसताना देखील पाचशे रुपयांपर्यंत पेमेंट करता येऊ शकते. ही एक ऑन डिव्हाईस वॉलेट सुविधा आहे. ज्यामध्ये यूपीआय पिन देखील न टाकता रियल टाईममध्ये पेमेंट करता येऊ शकते. यूपीआय लाईटमध्ये जास्तीत जास्त 2 हजार रुपये असणे आवश्यक असतात. यूपीएल लाईट लॉन्च झाल्यानंतर वापरकर्त्यांकडून व्यवहार मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करूनच व्यवहार मर्यादा पाचशे रुपये करण्यात आले आहे.