नवी दिल्ली । IPO आणण्याच्या तयारीत असलेल्या डिजिटल पेमेंट आणि फायनान्शिअल सर्व्हिस कंपनी Paytm समोर अडचण निर्माण झाली आहे. कंपनीचा IPO थांबवण्याच्या मागणीवर सोमवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांना IPO शी संबंधित प्रकरणाचा तपास तीन आठवड्यात पूर्ण करण्यास सांगितले आहे.
71 वर्षीय अशोक कुमार सक्सेना यांनी बाजार नियामक सेबीला IPO थांबवण्याची विनंती केली आहे. त्यांनी आरोप केला की,” ते या कंपनीचे सह-संस्थापक आहेत आणि दोन दशकांपूर्वी त्यांनी कंपनीमध्ये $ 27,500 (20.42 लाख रुपये) गुंतवले होते परंतु त्यांना कंपनीत कधीही शेअर्स मिळाले नाहीत.” त्याचवेळी, Paytm ने म्हटले आहे की,”अशोक कुमार सक्सेना आणि कंपनी यांच्यात साईन केलेले डॉक्युमेंट हे केवळ एक लेटर ऑफ इंटेंट आहे. हा करार नाही.”
सुनावणीनंतर सक्सेनाचे वकील अनुपन लाल दास म्हणाले की,” पोलिसांनी न्यायालयात स्टेटस रिपोर्ट सादर केला होता पण त्यांनी अद्याप तपास पूर्ण केला नाही. न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 सप्टेंबर रोजी होणार आहे.”
Paytm चा IPO लवकरच येऊ शकतो
डिजिटल पेमेंट आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी Paytm 16 हजार कोटींपेक्षा जास्तीचा IPO घेऊन लवकरात लवकर बाजारपेठेत येईल अशी माहिती आहे. Paytm चा IPO ऑक्टोबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. कंपनीने 15 जुलै रोजी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल केली होती. सेबीला कंपनीने सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये या प्रकरणाचा क्रिमिनल प्रोसिडिंगच्या कॉलममध्ये उल्लेख करण्यात आला आहे.