नवी दिल्ली । इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) पूर्वीच पेटीएम (Paytm) या दिग्गज डिजिटल पेमेंट कंपनीत खळबळ उडाली आहे. जुलैच्या शेवटी कंपनी IPO साठी अर्ज करणार आहे, परंतु त्याआधीच कंपनीच्या अनेक वरिष्ठ अधिका-यांनी राजीनामा दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पेटीएमच्या अध्यक्षांसह अनेक उच्च अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकूर यांचा देखील समावेश आहे.
अमित नय्यर यांनीही गेल्याच महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ते पेटीएमच्या वित्तीय सेवा विभागाचे प्रमुख होते. नय्यर ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीत रुजू झाले होते. नय्यर हे कंपनीचे लोन इन्शुरन्स, डिस्ट्रीब्यूशन, वेल्थ मॅनेजमेंट आणि स्टॉक ब्रोकिंगचा व्यवसाय पाहत होते. पेटीएममध्ये जाण्यापूर्वी नय्यर सल्लागार कंपनी अर्पवुड कॅपिटलमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत होते. पेटीएमच्या बोर्डाने नय्यर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
गेल्याच महिन्यात कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकूर यांनीही राजीनामा दिला होता. ते पेटीएममध्ये फक्त 18 महिनेच राहिले. नुसता ठाकूर आणि नय्यर यांनीच पेटीएमचा राजीनामा दिलेला नाही. यावर्षी अनेक अधिकाऱ्यांनी देखील या आधीच आपली पदे सोडली आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये जसकरणसिंग कंपाणी यांनी पेटीएमच्या हेड ऑफ मार्केटिंग पदाचा राजीनामा दिला. ते कंपनीत 6 वर्षे राहिले. पेटीएम सोडल्यानंतर कंपाणी Xiaomi India चे चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून रुजू झाले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा