बलात्काराप्रकरणी अटक झालेल्या पर्ल व्ही पुरीची जामिनावर सुटका; एकता कपूरसह करिष्मा तन्नाने घेतली बाजू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘नागिन ३’ फेम अभिनेता पर्ल व्ही. पुरी याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला पोस्को कायद्याअंतर्गत अटक केली होती. यानंतर त्याला आता जामीन मिळाला आहे. याबाबतची माहिती पर्लची मैत्रीण अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. सोबतच तिने सत्यमेव जायते असे कॅप्शन देत पर्लची बाजू सत्याची असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणावर निर्माती एकता कपूर हिनेही संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत रक्ताने अनेक विविध गोष्टींचा खुलासा करीत या केसचे वळणचं बदलून टाकले आहे.

https://www.instagram.com/p/CPuwHJinuj-/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता पर्ल व्ही पुरीसाठी जामिन मंजूर झाल्याची माहिती अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘सत्यमेव जयते. सत्य नेहमीच जिंकते आणि पर्ल जिंकला आहे.’ असे कॅप्शन दिले आहे. इतकेच नव्हे तर पोस्टमध्ये करिश्माने #IStandWithPearlPuri, #TruthNeverHides, #PVP सारख्या हॅशटॅगचा वापर केला आहे. अभिनेता पर्ल पुरी याला या संपूर्ण प्रकरणात केवळ जामीन मंजूर झाला असला तरीही अद्याप हे प्रकरण पूर्णपणे संपून त्याची सुटका झालेली नाही. त्यामुळे याच संदर्भात या केसला नवे वळण देणारी बाजू निर्माती एकता कपूरने मांडली आहे.पर्ल एकताच्या ‘नागिन’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता.

https://www.instagram.com/p/CPus3PjAjpy/?utm_source=ig_web_copy_link

या प्रकरणाची माहिती मिळताच एकताने पर्लची बाजू घेत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तीने सांगितले कि, ‘मुलींची छेडछाड करणाऱ्या किंवा त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या कलाकाराला माझ्या मालिकांमध्ये स्थान मिळत नाही. पण पर्ल निर्दोष आहे. त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. माझे कालच त्या तरुणीच्या आईशी बोलणे झाले आहे. तिने मला स्पष्ट शब्दात सांगितले की, मुलीचे वडिल अभिनेत्यावर खोटे आरोप करत आहेत. त्याला अटक व्हावी म्हणून त्यांनी एक बनावटी कथा रचली आहे.’ यासोबतच एकताने पर्ल आणि त्या तरुणीचा एक फोटो देखील शेअर केला आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे तरुणीच्या आईसोबत केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील एकताकडे आहे असे म्हणत पुरावा म्हणून हि क्लिप ती पोलिसांना देऊ शकते असा दावा तिने केला आहे. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी एकता कपूर आणि करिष्मा त्यांना यांच्या समर्थनाचा विरोध केला आहे.

 

वृत्तानुसार, एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी अभिनेता पर्ल व्ही पुरी याला पोलिसांनी अटक केली होती. अहवालानुसार या मुलीचे वय केवळ ५ ते ७ वर्षाच्या दरम्यान आहे. यामुळे पर्लवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका पोर्टलकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी दिलेल्या अनेक तक्रारींमध्ये असे लिहिले गेले आहे की, मुलीला पर्लबरोबर सेल्फी घ्यायची होती. त्यानंतर पर्ल तिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला.

Leave a Comment