हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : गेले काही दिवस शेअर बाजारात जोरदार घसरण सुरू आहे. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम आता भारतीय बाजारातही दिसून येतो आहे. मात्र असे असूनही काही शेअर्स गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. कारण या घसरत्या बाजारातही या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. ग्रीनक्रेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे शेअर्स देखील त्यापैकीच एक आहेत. पेनी स्टॉक असलेल्या या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा देऊन मालामाल केले आहे. BSE वर आज हे शेअर्स 16.5 रुपयांवर बंद झाले. Penny Stock
गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून हे शेअर्स सतत 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटच्या आसपास ट्रेड करत आहे. 27 सप्टेंबर रोजी कंपनीने स्टॉक स्प्लिटच्या रेकॉर्ड डेट बाबत स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे. ग्रीनक्रेस्ट फायनान्शिअल सर्व्हिसेसने 12 ऑक्टोबर ही स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट ठरवली आहे. स्प्लिटनंतर, या स्टॉकची फेस व्हॅल्यू 10 रुपयांवरून 1 रुपयांवर येईल. Penny Stock
गेल्या एका वर्षात यामध्ये 231.53 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच 8 ऑगस्टपासून हे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किटच्या पातळीला स्पर्श करत आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 60.35 कोटी रुपये आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी प्रचंड पैसा कमावला आहे. Penny Stock
ग्रीनक्रेस्ट ही कंपनी फायनान्शियल सर्व्हिसेस पुरवते. आधी या कंपनीचे नाव मॅरिगोल्ड ग्लास इंडस्ट्रीज लिमिटेड असे होते. मात्र मे 2013 मध्ये तिचे नाव बदलण्यात आले. ग्रीनक्रेस्ट बीएसई आणि कोलकाता स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. कंपनीकडून आपला अतिरिक्त निधी स्टॉक आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो. BSE वर उपलब्ध शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी जवळपास 1.25 टक्के आहे. Penny Stock
ऑक्टोबर 2017 मध्ये Greencrest Financial Services च्या शेअर्सची किंमत 700 रुपये होती. या पातळीपासून, शेअर 8 रुपयांचा नीचांक बनवून 16.51 रुपयांवर ट्रेड करत आहे. Penny Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://www.greencrestfin.com/
हे पण वाचा :
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, Garib Kalyan Yojana चा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवला
छोट्या शहरांमधील तरुणांमध्ये वाढतेय Online Dating App ची क्रेझ
Multibagger Stock : घसरत्या बाजारपेठेतही ‘या’ फुटवेअर स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला भरपूर नफा
‘या’ फार्मा कंपनीच्या Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षांत दिला कोट्यवधींचा नफा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजची किंमत तपासा