लोकं आमच्यावर थुंकतात; पश्चिम बंगालच्या ३०० नर्स नोकरी सोडून मणिपूरला माघारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोलकाताच्या अस्टपल्समध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या सुमारे ३०० नर्सेसनी लोकांच्या वागणुकीमुळे दुखावल्यामुळे राजीनामा दिला आहे. आता त्या सर्व नर्सेस मणिपूरला रवाना झाल्या आहेत. आणखीही काही नर्सेस आता कोलकाता सोडण्याच्या तयारीत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नर्सेसनी दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय ठरला आहे. कोलकातास्थित मणिपूर भवनचे उप निवासी आयुक्त जे.एस. जोयूरिता यांनी बुधवारी ही माहिती दिली.

नर्सेसना कोलकाता सोडायचे आहे
वृत्तसंसंस्था एएनआयच्या माहितीनुसार त्या म्हणाल्या की, ‘उद्या जवळपास ६० नर्सेस कोलकाता सोडतील. लोकं आम्हाला कॉल करीत आहेत आणि आम्ही मणिपूरला परत यावे अशी त्यांची इच्छा आहे. ‘ यापूर्वी असे सांगितले गेले होते की, कोलकाता रुग्णालयांमधील १८५ नर्सेसनी आपली नोकरी सोडून इम्फाळला परत गेल्या आहेत.

भेदभाव केल्याचा आरोप
क्रिस्टिला नावाची नर्स म्हणाली, ‘आम्हांला नोकरी सोडल्याचा आनंद नाही, मात्र कामाच्या ठिकाणी आमच्यात भेदभाव केला जातो. काहीवेळा लोक आमच्याबद्दल वर्णद्वेषी उद्गार काढतात. रुग्णालयांमध्ये पीपीई किटची कमतरता आहे. आपण जिथेही जाऊ तिथे लोक आम्हाला प्रश्न विचारू लागतात.

कोलकाता आहे कोविड -१९ च्या जाळ्यात
पश्चिम बंगालमधील कोविड -१९च्या स्थितीबद्दल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या राज्यात संसर्ग होण्याची २९९६ घटना घडल्या आहेत. यातील १०७४ लोक उपचारानंतर बरे झाले आहेत तर २५० जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारपर्यंत देशात कोविड -१९ च्या ११२२५९ घटना घडल्या आहेत. यापैकी ४५३०० लोक उपचारानंतर बरे झाले आहेत तर ३४३५ लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे.

अलिकडच्या काळात आरोग्य कर्मचार्‍यांवर झाला आहे हल्ला
येथील कोविड -१९ शी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यां विरुद्ध गेल्या काही दिवसांत अनेक गैरवर्तनाच्या घटना घडल्या आहेत. येथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्लेदेखील झाले आहेत तर अनेक ठिकाणी पोलिसांनाही लक्ष्य केले गेले आहे. हे झालेले हल्ले पाहता राज्य सरकारानेही कठोर पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कोरोना वॉरियर्सच्या संरक्षणासाठी कायद्यात बदल केला आहे. रासुका अँड गँगस्टर कायद्यांतर्गत आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ल्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment