गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; आयोजकांना अर्ध्यावर थांबवावा लागला कार्यक्रम

Rada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – गौतमी पाटीलचे नाव सध्या सगळ्या तरुणाच्या तोंडपाठ झाले आहे. तिची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. गौतमी पाटीलचा (Gautami Patil) डान्स मग गर्दी तर होणारच! सध्या बीडमध्ये अशाच एका कार्यक्रमामध्ये गौतमी पाटील (Gautami Patil) आली असता त्या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या कर्यक्रमादरम्यान अचानक शेकडो प्रेक्षक स्टेजवर चढले त्यामुळे आयोजकांना हा कार्यक्रम अर्धवट थांबवावा लागला. एवढच काय तर रस्त्यालगत 1 तास ट्रॅफिक जाम सुद्धा झालं होतं. त्यामुळे प्रवाशांनादेखील यादरम्यान मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला.

काय घडले नेमके?
बीड शहराजवळील बीड -परळी राष्ट्रीय महामार्ग लगत घोडका राजुरी शिवारात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बारमालक रोहन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने गौतम पाटील हिला बोलावण्यात आले होते. गौतमी पाटील म्हणल्यावर तरुणांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

या कार्यक्रमादरम्यान शेकडो लोक स्टेजवर चढल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी स्टेजवर दगडफेक झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. गौतमी पाटील (Gautami Patil) सुखरूप असून कार्यक्रमाच्या आयोजकांवर हा कार्यक्रम अर्ध्यावर बंद करण्याची वेळ आली. या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट