हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: संपूर्ण देशात एकीकडं कोरोनाने कहर केला आहे तर त्याबरोबरच येणाऱ्या म्युकोरमायकोसिस म्हणजे काली बुरशी या रोगने देखील थैमान माजवायला सुरूवात केली आहे. कोरोना झालेल्या किंवा कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना आता म्युकोरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होतानाचे चित्र दिसत आहे. त्याची संख्या देखील अधिक वेगाने वाढते आहे. मात्र हा आजार केवळ कोरोनातून बरे झालेल्या किंवा कोरोना झालेल्या व्यक्तींना होत नसून इतर व्यक्तींना देखील या आजाराचा धोका असू शकतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ज्या लोकांना कोविड नाही अशांनाही म्युकोरमायकोसिस या आजाराचा धोका असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. ज्या लोकांच्या शरीरात ब्लड शुगर नियंत्रित नाही अशा व्यक्तींना म्युकोरमायकोसिस आजाराचा धोका अधिक आहे. ब्लॅक फंगस हा असा आजार आहे जो covid-19 महामारी पूर्वी अस्तित्वात होता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या आजाराबाबत शिकवले जाते.
मधुमेह असणाऱ्यांना धोका आधीक
-मधुमेह असणाऱ्या लोकांना या आजाराचा संसर्ग होऊ शकतो
– अनियंत्रित मधुमेह आणि इतर आजारांचा संसर्ग झाल्यास म्युकोरमायकोसिसचा धोका उद्भवू शकतो असं निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले.
-डायबिटीस नियंत्रणात नसेल तर त्या व्यक्तीला काळ्या बुरशीचा आजार होऊ शकतो.
-डॉ. व्ही के पॉल म्हणतात जर शरीरातील साखरेचे प्रमाण सातशे ते आठशे पर्यंत पोहोचते तेव्हा त्याला डायबिटीस केटोसिडॉसिस म्हणजे काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं म्हटलं जातं.
हा आजार युवक आणि ज्येष्ठांना मध्ये सर्वसामान्य आहे निमोनिया सारख्या आजारामुळे देखील हा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यात आता कोरोना मळे त्याची तीव्रता आणखी वाढली आहे. स्टिरॉइड च्या वापरामुळे परिस्थिती बिघडली आहे परंतु कोविड नसतानाही खूप कमी प्रमाणात लोकांना हा आजार होण्याची शक्यता असते असं डॉक्टर पॉल म्हणाले आहेत.
तसेच निरोगी लोकांना हा संसर्ग होण्याची काहीच शक्यता नाही त्यामुळे त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे त्यांना याचा धोका आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेने लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला असावा त्यामुळे covid-19 नंतर म्युकॉर्मयकॉसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याशिवाय दुसऱ्या लाटेत स्टिरॉईडचा वापर वाढल्याने देखील हा धोका असावा. योग्य तपास केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही असं मत एम्स मधील डॉक्टर निखील टंडन यांनी मांडले आहे.