नवी दिल्ली | पुढील महिन्यापासून म्हणजे मार्च 2021 पासून पन्नास वर्षावरील नागरिकांना कोविडची लस देण्याची योजना केंद्र शासन आखत आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. तसेच, केंद्र शासन त्यावर प्रायोरिटीने काम करत आहे. अशी सूचनाही त्यांनी दिली.
भारताने देशामधेच करोनाची लस बनवली. आणि गेल्या काही दिवसांपासून ती देण्यासही सुरुवात केली. सुरुवातीचा टप्पा सद्ध्या सुरू असून. या टप्प्यामध्ये करोनाची लस ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या लोकांना त्यामध्ये, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस जवान, आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे.
We will be in a situation to administer vaccines to those above 50 years of age in March: Union Health Minister Dr Harsh Vardhan#COVID19 pic.twitter.com/619iBh0hPS
— ANI (@ANI) February 15, 2021
करोनावरील लस ही तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. पहिला टप्पा हा फ्रन्टलाइन वारियर म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यामध्ये वयोवृद्ध नागरिक आणि खूप जास्त सिरीयस असलेल्या पेशंटला व तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व नागरिकांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी दिली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’