माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माढा प्रतिनिधी |माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. या मतदारसंघात शेवट पर्यत चुरशीची लढत झाली. मात्र मतदारांनी म्हणावा तसा प्रतिसाद  नदिल्याने माढा लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा टक्का ५६.३७ टक्क्यावरच अडकून राहिला आहे. तर  विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक मतदान माढा मतदारसंघात झाले आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात ६०. ११ टक्के मतदान झाले असून मोहिते पाटलांचा गड मानला जाणाऱ्यामाळशिरस मतदारसंघात ५७.३९ टक्के मतदान झाले आहे.   तर भाजपचे उमेदवार असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राहत्या विधानसभा मतदारसंघात म्हणजे फलटणमध्ये ५६.६९ टक्के मतदान झाले. तर तिकडे माण विधानसभा मतदारसंघात ५२.४७ टक्के मतदान झाले. सांगोला ५५.१८ तर करमाळ्यात ५६.४३ टक्के मतदानाची नोंद झाली.

दरम्यान माढा मतदारसंघात कोणाचा विजय होणार या बाबत उलट सुलट अंदाज व्यक्त केले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  माळशिरस तालुक्यात भाजपकडे पूर्णपणे मतदारांचा कल होता. तर माणमध्ये देखील भाजप लोकांच्या पसंतीला उतरल्याचे बोलले जात आहे. तर फलटणमध्ये राष्ट्रवादीला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर सांगोल्यात हि अशीच काहीशी स्थिती पाहण्यास मिळाली. तर करमाळा आणि माढा तालुक्यात  अटीतटीचे मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

माढा लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार

लोकसभा मतदान : दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज होणार मतयंत्रात बंद

नगर दक्षिणमध्ये भाजप विजयी होण्याचा आमदार कर्डिलेंनी केला विश्वास व्यक्त

सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना खुद्द ईव्हीएमचा फटका

जाणून घ्या कसे बनवतात चिकन सीस्क्टीफाय