मुंबई । राज्य सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, नागरिकांना अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. एसटी सेवा ही जिल्हांतर्गत सुरू होती. पण आता एसटी ही दुसऱ्या जिल्ह्यात ही जाणार आहे. याआधी राज्यातील उद्योग, व्यापार, दुकाने सुरू केले गेले आहे. पण शहरी भागातून ग्रामीण भागात होणारा संसर्ग टाळावा, राज्यात जिल्हा बंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर फक्त शेतीमाल, औद्योगिक तसेच इतर माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती.
पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या शहरांतून नागरिक आपल्या मूळ गावी जात आहेत. पण यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका ही वाढेल. त्यामुळे सरकारने जिल्हा बंदी कायम ठेवली होती. काही अत्यावश्यक कामाशिवाय कोणालाही जाण्यासाठी परवानगी नव्हती. पण आता एसटीने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. खासगी वाहनांना ई-पास मात्र आवश्यक असणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”