औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना कोरोनाचे नियम शिथिल करून ठराविक कालावधीसाठी दुकाने, बाजारपेठ, मॉल, बसेस, रेल्वे करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याला परवानगी द्यावी नाहीतर महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस एकाच दिवशी सुरु करण्यात येतील. आणि कारवाई केल्यास क्लासेस संचालक विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप प्रणीत कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे.
सरकारने लॉकडाऊन लावताना शाळा महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता परंतु कोचिंग क्लासेस सुरू करताना खाजगी कोचिंग क्लासेस चा कुठेच उल्लेख केलेला नाही. खाजगी कोचिंग क्लासेस शासनाच्या कोणत्या विभागाअंतर्गत येतो हे शासनालाही माहीत नाही. त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेसची दखल घेतली जात नाही अशी खंत कोचिंग क्लास असोसिएशनने व्यक्त केली आहे. खाजगी क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी न दिल्यास एकाच दिवशी म्हणजे 17 ऑगस्टला सर्व खाजगी क्लासेस सुरू करू असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईमेलद्वारे खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी निवेदन पाठविण्यात आले आहे.
कोरोनामूळे दीड वर्षापासून सरकारने शिकवणी वर्ग सक्तीने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. गुणवत्ता वाढविण्याच्या मागे खाजगी शिकवणी क्लासचे फार मोठे योगदान असून खाजगी कोचिंग क्लासेस पालकांकडून जमा झालेला फीस वर अवलंबून असतात. सध्या आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आता तरी कोचिंग क्लासेसचा विचार करावा आणि क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.