परभणी जिल्ह्यात युवकाचे ‘सिनेस्टाईल अपहरण’

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी। एक काळ्या रंगाची कार भरधाव वेगात येते, अचानक जोराचा ब्रेक मारल्या जातो, त्यामधून चार ते पाच धाडधिप्पाड युवक खाली उतरतात आणि अचानक एका युवकास बेदम मारहाण करत गाडीत टाकून क्षणार्धात ती काळी गाडी भरधाव वेगात निघून जाते. एका हिंदी चित्रपटात दाखवले जाणारे सिनेस्टाईल अपहरणनाट्य परभणी जिल्हातील सोनपेठ शहरात घडल्याची घटना शहरातल्या बस स्टँड सारख्या अतिवर्दळीच्या ठिकाणी घडली.

सोनपेठ शहरातील बस स्टँड समोर आज भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक एक काळ्या रंगाची बलेनो कार भरधाव वेगात आली. त्यामधून ४ ते ५ अज्ञात युवक उतरले. त्यांनी बस स्टँड समोर उभ्या असणाऱ्या एका युवकाला अचानक मारहाण करायला सुरुवात करून त्याला कारमध्ये जबरदस्तीन बसवून पळवून नेल्याची घटना घडली.

हा सर्व प्रकार आसपास उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी पहिला. कोणाला कळायच्या आत अपहरणकर्ते युवकाला गाडीत टाकून घेऊन गेले. अपहरणाच्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पळवून नेण्यात आलेला युवक नेमका कोण होता?, या अपहरणामागे नेमके काय कारण होते? अपहरणकर्ते कोण होते?  याची माहीती अजूनही उघडकीस आली नाही आहे. शहरातील या अपहरणा बाबत सोनपेठ पोलिसांना मात्र तीळ मात्र ही कल्पना नसल्याचे प्रथमदर्शी कळत आहे. परंतु अशा पद्धतीने दिवसा ढवळ्या शहरातून युवकाचे अपहरण झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झालं आहे