हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Finance : आता लवकरच नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. आता 2 महिन्यांनंतर आपण सगळे 2023-24 या आर्थिक वर्षात प्रवेश करणार आहोत. त्यानंतर लोकं पुन्हा एकदा कराबाबतचे नियोजन आणि इतर आर्थिक निर्णयांबाबत विचार करू लागतील. मात्र, त्याआधीच फेब्रुवारीमध्येही असे काही बदल होणार आहेत, ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतील. यासोबतच, RBI च्या MPC बैठक देखील होणार आहे. ज्याच्या पॉलिसी रेटमधील बदलाचा परिणाम देखील दिसून येईल. मात्र पुढील महिन्यात असे 5 मोठे बदल होणार आहेत, ज्याकडे लक्ष द्यावे लागेल. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेउयात…
कॅनरा बँकेच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ
कॅनरा बँक 13 फेब्रुवारीपासून आपल्या डेबिट कार्डच्या वापरावरील सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करणार आहे. ज्यामुळे आता बँकेच्या क्लासिक डेबिट कार्डची वार्षिक फी 125 रुपयांवरून 200 रुपयांपर्यंत वाढणार आहे. यानंतर प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी 500 रुपये आणि बिझनेस डेबिट कार्डसाठी 300 रुपये मोजावे लागतील. याबरोबरच कार्ड बदलण्याचे शुल्कही 50 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आले आहे. Personal Finance
MPC ची बैठक
8 फेब्रुवारी रोजी RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) ची बैठक होणार आहे. आत पॉलिसी रेटमध्ये 25-35 बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे जाणून घ्या कि, गेल्या वर्षी देखील MPC ने पॉलिसी दरांमध्ये 225 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. यामधील 100 बेसिस पॉइंट्स म्हणजे 1 टक्के. जर आणखी दरवाढ झाली तर कर्जे पुन्हा महागतील. Personal Finance
T+2 सेटलमेंट सायकल
27 जानेवारीपासून स्टॉकमध्ये T+1 सेटलमेंट सायकल लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे पैसे आता दुसऱ्याच दिवशी आपल्या डिमॅट खात्यामध्ये जमा केले जाईल. त्याच्याशी जोडलेले म्युच्युअल फंड, जे आता T+3 रिडेम्प्शन सायकलचे अनुसरण करत होते, ते आता T+2 रिडेम्प्शन सायकलकडे जातील. Personal Finance
HDFC रिवॉर्ड रिडेम्पशन
HDFC बँकेकडून आपल्या मिलेनिया डेबिट कार्डसाठीच्या रिवॉर्ड रिडम्शनचे निकष बदलण्यात आले आहेत. 1 फेब्रुवारीपासून हा बदल लागू केला जाणार आहे. ग्राहक आता उत्पादनाच्या किंमतींच्या 70 टक्के रिडीम करू शकतात आणि उर्वरित रक्कम क्रेडिट कार्डद्वारे भरावी लागेल. कॅशबॅकसाठी दर महिन्याला फक्त 3000 रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करू शकता. Personal Finance
टॅक्स प्लॅनिंग
नवीन आर्थिक वर्ष सुरू होणाया 2 महिने बाकी आहेत, मात्र आतापासूनच कर नियोजनाला सुरुवात केली तर जास्त फायद्याचे ठरेल. टॅक्स वाचवण्यासाठी फेब्रुवारीपासूनच PPF, NPS, SSY, ELSS किंवा लाइफ इन्शुरन्स प्रीमियम यांसारख्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक सुरू करता येईल. Personal Finance
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :
हे पण वाचा :
New Business Idea : सतत मागणी असलेल्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये
Investment Tips : ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मुलांच्या भविष्यासाठी जमवा लाखो रुपये
Flipkart Sale मध्ये 1500 रुपयांपेक्षा कमी किंमतींत उपलब्ध आहेत ‘हे’ स्मार्टफोन
Business Idea : वर्षभर मागणी असणाऱ्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न !!!
Financial Changes : 1 फेब्रुवारी 2023 पासून ‘या’ नियमांत होणार बदल,याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होईल ते पहा