हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Finance : आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक नियमांमध्ये 1 जुलैपासून बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. याचबरोबर 1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूकदार आणि पॅन कार्डधारकांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जुलैपासून लागू होणारे हे नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे आपल्यासाठी ठरेल. हे लक्षात घ्या कि, या नियमांकडे दुर्लक्ष केले गेले तर आपल्याला आर्थिक नुकसानी बरोबरच अडचणींना देखील तोंड द्यावे लागू शकेल.
तसेच जुलैमध्ये महागाईचाही फटका बसू शकेल. याबरोबरच जर दुचाकी खरेदी करणार असाल तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतील. कारण देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने दुचाकींच्या किंमती वाढवण्याची नुकतीच घोषणा केली आहे. Personal Finance
आधार-पॅन लिंक केल्यास दुप्पट दंड
दंड भरून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. हे जाणून घ्या कि, 30 जूनपर्यंत 500 रुपये दंड आहे. जर 1 जुलै नंतर आधारशी पॅन लिंक केले तर 1000 रुपये दंड भरावा लागेल.
डेबिट आणि क्रेडिट कार्ड डिटेल्स सेव्ह करता येणार नाहीत
1 जुलैपासून पेमेंट गेटवे, व्यापारी, पेमेंट एग्रीगेटर आणि अॅक्वायरिंग बँका कार्डचे डिटेल्स सेव्ह करू शकणार नाहीत. यानंतर ई-कॉमर्स कंपन्याना आपल्या ग्राहकांचे कार्ड डिटेल्स त्यांच्याकडे सेव्ह करू शकणार नाहीत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहण्यास मदत होईल.
KYC न केलेली डीमॅट खाती बंद केली जाणार
डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खात्यासाठी KYC करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. या तारखेपर्यंत e-KYC न केलेली खाती बंद केली जातील. तसेच 1 जुलैपासून अशा खात्याद्वारे शेअर ट्रेडिंग करता येणार नाही. डिमॅट खात्यात शेअर्स आणि सिक्युरिटीज ठेवण्याची सुविधा दिली जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या डीमॅट खात्याची आणि ट्रेडिंग खात्याचे KYC 30 जूनपर्यंत पूर्ण केले नाही तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. Personal Finance
दुचाकींच्या किंमती वाढणार
1 जुलैपासून दुचाकी क्षेत्रातील दिग्गज Hero MotoCorp ने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यानंतर कंपनीची वाहने 3,000 रुपयांनी महागतील. सतत वाढणाऱ्या महागाईमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. आता Hero MotoCorp प्रमाणे इतर कंपन्या देखील आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची शक्यता व्यक्त होते आहे. Personal Finance
क्रिप्टो गुंतवणूकदारांना भरावा लागणार TDS
1 जुलै नंतर क्रिप्टोकरन्सीसाठीच्या एका वर्षातील 10,000 रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शनवर एक टक्के शुल्क आकारले जाईल. कारण नुकतेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने व्हर्चुअल डिजिटल ऍसेट्स (VDA) साठी TDS चे डिस्क्लोजर मानदंड अधिसूचित केले आहेत. ज्यामुळे आता सर्व NFT किंवा डिजिटल करन्सी त्याच्या कक्षेत येतील. Personal Finance
TDS चे नियमही बदलणार
1 जुलैपासून, व्यवसायाकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर 10 टक्के दराने TDS भरावा लागेल. हा टॅक्स सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि डॉक्टरांवर लागू होणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना कंपनीने त्यांना मार्केटिंगसाठी दिलेले प्रॉडक्ट्स स्वतःकडे ठेवल्यावर TDS भरावा लागेल. जर त्यांनी प्रॉडक्ट्स परत केले तर TDS भरावा लागणार नाही. Personal Finance
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/commonman/English/Scripts/PressReleases.aspx?Id=2522
हे पण वाचा :
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? ते घ्यावे की नाही ??? समजून घ्या
FD-RD अन् PPF वरील व्याजावर Tax द्यावा लागेल का ???
FD Rates : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीनदर तपासा
PAN-Aadhaar Link करण्यासाठी उरले फक्त 3 दिवस !!! त्यासाठीची प्रक्रिया पहा
आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!