हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Loan : काही प्रसंगी अनेकदा आपल्याला तातडीने पैशांची गरज भासते आणि अशावेळी आपल्याकडे पैसे नसतात. अशा परिस्थितीत, आपली पैशांची गरज भागवण्यास पर्सनल लोन मदत करते. विशेषत: सणासुदीच्या काळात आपला खर्च भागवण्यासाठी लोकांना पैशांची जास्त गरज असते. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या खाजगी आणि सरकारी बँकाकडून कर्ज घेतले जाते. मात्र प्रत्येक बँकेमध्ये यासाठी वेगवेगळा व्याजदर असेल.
हे लक्षात घ्या कि, Personal Loan शी संबंधित असे अनेक नियम असतात, ज्याबाबतची माहिती फारच कमी लोकांकडे असते. अशा परिस्थितीत, त्याच्याशी संबंधित काही खास पैलूंबाबत जाणून घेणे खूप महत्वाचे ठरेल. आज आपण असेच काही नियम आणि कोणत्या बँकेमध्ये किती दराने कर्ज मिळेल याबाबत सविस्तरपणे जाणून घेउयात…
अशा प्रकारे घेता येईल कर्ज
इथे हे लक्षात घ्या कि, Personal Loan मिळवण्यासाठी आपल्याला कोणतीही मालमत्ता तारण ठेवण्याची किंवा गॅरेंटीची गरज नसते. यामध्ये काही गोष्टी आणि कर्ज फेडण्याची आपली क्षमता पाहूनच बँकेकडून कर्ज दिले जाते. मात्र पर्सनल लोनसाठी काही महत्वाची कागदपत्रे आणि पात्रता आवश्यक असतील. तसेच चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्यांना कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच जर आपण एखाद्या संस्थेत किमान एक वर्ष काम करत असाल तरी देखील आपल्याला सहजपणे पर्सनल लोन मिळू शकेल. तसेच सलग 2 वर्षे व्यवसाय केल्यानंतर Personal Loan मिळू शकेल.
चला तर मग कोणत्या बँकांकडून किती व्याज दराने कर्ज मिळेल ते जाणून घेउयात…
बँक व्याज दर (वार्षिक)
स्टेट बँक ऑफ इंडिया 9.60% – 15.65%
बँक ऑफ इंडिया 10.35% – 12.35%
बँक ऑफ बडोदा 10.50% – 12.50%
HDFC बँक 10.5% – 21.00%
कोटक महिंद्रा बँक 10.25% आणि त्याहून जास्त
येस बँक 10.99% – 16.99%
एक्सिस बँक 12% – 21%
इंडसइंड बँक 10.49% – 31.50%
HSBC बँक 9.50% – 15.25%
सिटी बँक 9.99% – 16.49%
कर्नाटक बँक 12% – 17%
फेडरल बँक 10.49% – 17.99%
IDFC फर्स्ट बँक 10.49% पासून सुरू
टाटा कॅपिटल 10.99% पासून सुरू
होम क्रेडिट कॅश लोन 19% – 49%
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 11.49% – 16.49%
आदित्य बिर्ला कॅपिटल 14%-26%
IIFL 24% पासून सुरू
‘या’ कागदपत्रांची आवश्यकता भासेल
बँकेकडून Personal Loan घेण्यासाठी तुम्हाला जॉब डिटेल्स, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल. कागदपत्रे ऑनलाइन सबमिट केल्यानंतर किंवा अपलोड केल्यानंतर ते व्हेरिफाय केले जाईल. व्हेरिफिकेशननंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते. जर कागदपत्रे बरोबर नसतील आणि ते व्हेरिफाय केलेले नसतील तर कर्ज मिळू शकणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/personal-loans-schemes
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी फ्रीमध्ये मिळेल Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन !!!
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!
Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!