Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4 वर्षांपूर्वी ज्या मैदानातून Hardik Pandya ला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले त्याच मैदानावर त्याने कारकिर्दीतील अविस्मरणीय खेळी करत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. यावेळी त्याने केलेल्या खेळीचा चाहत्यांना कधीच विसर पडू शकणार नाही. कारण त्याच्या या खेळीमुळे 10 महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला गेला. आता पाकिस्तानविरुद्धच्या या विजयाने भारताचा आनंद द्विगुणित झाला नाही तर नवलच. पांड्या देखील अगदी अशाच पद्धतीने आपली बॅट आकाशाकडे उंचावत मैदानाबाहेर आला.

Hardik Pandya bowling 4 overs now, but not sure for how long': Ex-India captain | Cricket - Hindustan Times

पाकिस्तानविरुद्धच्या अष्टपैलू खेळीनंतर Hardik Pandya ला 4 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण झाली. ज्यामुळे त्याच्या गोलंदाजी करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यामुळे त्या घटनेशी संबंधित एक फोटो आणि पाकिस्तानविरुद्ध केलेल्या खेळीशी संबंधित एक फोटो शेअर करत त्याने आपली दुखापत आणि संघातील पुनरागमनाबाबत सांगितले.

Hardik Pandya ने शेअर केलेला फोटो आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याशी संबंधित आहे. पहिला फोटो हा 2018 चा आहे तर दुसरा फोटो 2022 चा आहे. एका फोटो मध्ये त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेले जाताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटो मध्ये तो बॅट वर करताना दिसत आहे. जणू तो सांगतोय की,” आता क्रिकेट जगतावर त्याचेच राज्य असेल.” या फोटोसोबत कॅप्शन देताना त्याने म्हटले की, पुनरागमन हे नेहमीच आघातापेक्षा मोठे असते.

दुखापतीनंतरचे जबरदस्त पुनरागमन

4 वर्षांपूर्वी म्हणजेच 19 सप्टेंबर 2018 रोजी दुबईतच पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक सामना खेळला गेला होता. त्यामध्ये या अष्टपैलू खेळाडूला पायाच्या वेदनांमुळे स्ट्रेचरवर मैदान सोडावे लागले होते. ज्यानंतर तो जवळजवळ संपलाच असे मानले जात होते. त्याची दुखापत इतकी खोलवर होती की यावेळी त्याला संपूर्ण 5 षटकेही टाकता आलेली नव्हते कि त्याला धड नीट उभेही राहता येत नव्हते. यामुळेचा त्याला स्ट्रेचरमधून बाहेर काढावे लागले होते. आता त्याच मैदानावर Hardik Pandya ने फक्त फलंदाजीच केली नाही तर 4 षटकात 25 धावा देत 3 बळी घेत गोलंदाजीतही चमक दाखविली.

Watch: India's winning moment as Hardik Pandya smokes nonchalant six vs Pakistan | Cricket - Hindustan Times

‘4 वर्षांपूर्वी घडलेली ती घटना मला आजही आठवते’ – पंड्या

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामधील विजयी कामगिरीनंतर Hardik Pandya म्हणाला,” मला त्या सर्व गोष्टी आठवत होत्या जेव्हा मला स्ट्रेचरवरून ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले. अशा परिस्थितीतून जाणे आणि आज संधी मिळणे हे आपल्यासाठी एक यश आहे असे वाटते.” यावेळी हार्दिकने आपल्या यशस्वी पुनरागमनाचे श्रेय भारतीय संघाचे माजी फिजिओ आणि सध्या बीसीसीआयचे क्रीडा विज्ञान प्रमुख नितीन पटेल तसेच सध्याचे कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांना दिले.

‘माझ्या पुनरागमनात या दोन व्यक्तींचा मोठा वाटा’

Hardik Pandya पुढे म्हणाला कि, ”हा प्रवास खूप चांगला झाला आणि मेहनतीचे फळ आम्हाला मिळत आहे. मात्र या काळात ज्यांनी मला तंदुरुस्त करण्यात महत्वाची भूमिका बजावली, त्यांना याचे कधीच श्रेय मिळाले नाही. मला नेहमीच त्या लोकांना श्रेय द्यायचे आहे जे यासाठी पात्र आहेत. मी ज्या प्रकारे पुनरागमन केले त्याचे श्रेय मी नितीन पटेल आणि सोहम देसाई यांना देईन.”

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icccricketschedule.com/asia-cup-2022-schedule-team-venue-time-table-pdf-point-table-ranking-winning-prediction/

हे पण वाचा :

Business Idea : पोस्ट ऑफिसद्वारे दरमहा चांगले पैसे कमावण्याची संधी !!!

Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.!!!

Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण, आजचे नवीन भाव पहा

PIB FactCheck : PAN अपडेट केले नाही तर SBI खाते बंद होणार, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या