बदलापूर : हॅलो महाराष्ट्र – बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पाळीव कुत्र्याने (pet dog attacked) इमारतीतल्या एका लहान मुलाला चावा घेतला आहे. यानंतर पीडित मुलाच्या पालकांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित पाळीव कुत्र्याच्या (pet dog attacked) मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा मुलगा त्याच्या पालकांसोबत इमारतीमधील पायरीवरून खाली जात होता. त्याचवेळेस अचानक घरातून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याने मुलाच्या पायाला चावा घेतला. आता हे प्रकरण पोलिसांत गेल्याने पोलीस मालकाविरोधात काय कारवाई करतात हे पाहावे लागेल.
बदलापुरात पाळीव कुत्र्याचा चिमुरड्यावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद pic.twitter.com/GBxjdQIOpT
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 23, 2022
काय घडले नेमके ?
बदलापूर पश्चिमेच्या बॅरेज रोडला रितू वर्ल्ड नावाची सोसायटी आहे. या सोसायटीतल्या ‘ई’ बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावर निलेश बांगे हे परिवारासह वास्तव्याला आहेत. त्याच इमारतीत पाचव्या मजल्यावर भावेश चौहान हे देखील राहतात. चौहान यांच्याकडे पांढऱ्या रंगाचा एक पाळीव कुत्रा आहे. शनिवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास निलेश बांगे हे त्यांचा मुलगा गौरांग याच्यासह जिन्याने खाली उतरत होते. ते पाचव्या मजल्यावर आले असता अचानक भावेश चौहान यांच्या घरातून त्यांचा पाळीव कुत्रा धावत (pet dog attacked)आला आणि त्याने गौरांगवर हल्ला चढवत त्याच्या पायाचा चावा घेतला.
यावेळी निलेश यांनी कुत्र्याला हाकलल्याने तो आत पळाला. ही सगळी घटना जिन्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.यानंतर निलेश बांगे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पाळीव कुत्र्याच्या मालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 289 आणि 337 अन्वये कुत्र्याचे मालक भावेश चौहान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
हे पण वाचा :
तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान
केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन
उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब