एका हातात पेट्रोल अन् दुसर्‍यात डिझेल.. कंबरेखाली गॅस सिलेंडर… तरुण शेतकरी जे बोलतोय ते एकदा ऐकाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | हातामध्ये डिझेल व पेट्रोल ची बॉटल घेऊन अन् कमरेला गॅस सिलेंडर बांधून एक शेतकरी थेट डि.पी. वर चढल्याची घटना औरंगाबादेत घडलीय. अल्ला हो अकबर जय हनुमान..सबको उजाला दे भगवान असं म्हणत या तरुण शेतकर्‍यानं हटके अंदाजात आंदोलन केलंय. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झालाय.

युवा शेतकरी मंगेश साबळे यांनी फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात सकाळी नऊ वाजता एम एस ई बी च्या कार्यालयांमधील डीपी वरती चढून अनोखं आंदोलन केलंय. मंगेश या युवा शेतकऱ्याने प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासन निवेदनाची दखल घेत नसल्याने शेवटी वैतागलेल्या मंगेशने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

एकीकडे डिझेलची दरवाढ, पेट्रोलची दरवाढ, खाद्यतेलाची दरवाढ, घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ आणि त्यामध्ये आता हे लोड शेडींग. आम्हा शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? काय परिस्थिती सरकारने आमच्यावर आणून ठेवली आहे? असं म्हणत मंगेशने सरकारचा निषेध केलाय. अर्धा ते पाऊण तास आंदोलन केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी मंगेश साबळे यांची समजूत घालत डीपी वरून खाली उतरवले. पाच दिवसांमध्ये लोडशेडिंगचा प्रश्न संपेल असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर सदर युवा शेतकरी शांत झाला.