राऊतांकडून राणा दाम्पत्याचा उल्लेख ‘बंटी और बबली’; म्हणाले की, स्टंटबाजी करणं त्यांचं कामच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमानं चालीसा पठण करणार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले असून त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य आज करत मुंबईला पोचले, यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याचा उल्लेख बंटी और बबली असं करत ते जर मुंबईत आले असतील तर येउद्या, त्यांना मुंबईचे पाणी माहित नाही असा इशारा दिला आहे

संजय राऊत हे सध्या नागपूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधताना नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बंटी आणि बबली पोहोचलेच आहेत तर आम्हाला काही अडचण नाहीये. हे फिल्मी लोक आहेत, स्टंटबाजी करणं मार्केटिंग करणं त्यांचे काम आहे . भाजपाला आता मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज पडत आहे असं टोला त्यांनी लगावला

हनुमान चालिसा असो किंवा राम मंदीर असो, हे धार्मिक आणि श्रद्धेचे विषय आहेत. मात्र भाजपकडून सी ग्रेड अ‍ॅक्टर्सच्या मदतीने यावर केवळ नौटंकी सुरू आहे. हिंदुत्वाच्या नावावर भाजपकडून सध्या देशभरात जे वातावरण तापवले जात आहे. त्यातील हे दोघे पात्र आहेत. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठारेंकना हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान दिले होते. जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा म्हणली नाही तर आम्ही स्वतः मातोश्री समोर येऊन हनुमान चालीसा म्हणून असं त्यांनी म्हंटल होत त्याच पार्श्वभूमीवर आज राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले असून शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. एकूणच मुंबईत सध्या शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा सामना पाहायला मिळत आहे