हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Petrol Diesel Price : देशात आतापर्यंत सर्वात महागड्या किंमतीत पेट्रोल देण्याच्याबाबतीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. ज्यानंतर पेट्रोलच्या किंमती कमी होणार आहेत.
आज शिंदे यांच्या सरकारने पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी कमी केले आहे. यानंतर आता महाराष्ट्रात पेट्रोलचा दर 106.35 रुपये तर डिझेलचा दर 94.28 रुपये प्रतिलिटर होईल. हे लक्षात घ्या कि, आतापर्यंत महाराष्ट्रात पेट्रोलचे दर 111 रुपयांपेक्षा जास्त होते. मात्र देशात अजूनही काही अशी अनेक राज्ये आहेत जिथे पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या वर आहे. Petrol Diesel Price
सर्वात महाग पेट्रोल आता इथे मिळणार
महाराष्ट्रातील दर कपातीनंतर आता सर्वात महाग पेट्रोल देणाऱ्यांमध्ये तेलंगणाचा नंबर लागला आहे. जिथे एक लिटर पेट्रोलची किंमत 111.73 रुपये आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे जिथे सध्या एक लिटर पेट्रोलची किंमत 111.16 रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून जिथे पेट्रोल 109.71 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. याबरोबरच 100 रुपयांपेक्षा जास्त दर असलेल्या राज्यांमध्ये बिहार 109.15 रुपये , छत्तीसगड 13.08 रुपये, जम्मू आणि काश्मीर 100.40 रुपये, झारखंड 100.72 रुपये, कर्नाटक 102.61 रुपये, केरळ 106.56 रुपये, मणिपूर 101.28 रुपये, ओडिशा 104.71 रुपये, राजस्थान 108.55, सिक्किम 102.50 रुपये, तामिळनाडू 103.62 रुपये आणि पश्चिमी बंगाल 106.79 रुपये आहे. Petrol Diesel Price
इथे मिळत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल
देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल सध्या अंदमान आणि निकोबारमध्ये मिळत आहे. जिथे एक लिटर पेट्रोल 84.10 रुपयांना मिळेल. यानंतर दमण दीवमध्ये पेट्रोल 94.24 रुपये आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये 94.62 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. यूपीमध्ये पेट्रोल 96.49 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे. तर दिल्लीमध्ये 96.7 रुपये प्रति लिटर आहे. उत्तराखंडमध्येही पेट्रोल 95.63 रुपये प्रति लिटर आहे. Petrol Diesel Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://iocl.com/petrol-diesel-price
हे पण वाचा :
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे का ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा
Gold Investment : सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, नवीन दर तपासा
BREAKING : आज रात्रीपासून पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा