सलग सातव्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरात वाढ 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या सात दिवसांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायचे नावच घेत नाहीत. सातत्याने हे दर वाढत आहेत. तर कच्च्या तेलाच्या किंमतीत दरदिवशी घटच होते आहे. तरीही पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

आज (शनिवारी) राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ७५रु झाले आहे. तर मध्यप्रदेशमध्ये शिवराज सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर १-१ रुपये कर लावला आहे. देशातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात ५९ ते ६० पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात ५० ते ६० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात पेट्रोलच्या दरात ३.९० रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात ४ रुपये प्रतिलिटर वाढ झाली आहे.

आज दिल्लीतील पेट्रोलचा दर ७५ रु प्रति लिटर आहे. तर डिझेल ७३.३९ रु प्रति लिटर झाले आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत डिझेलचे दर अधिक आहेत. मुंबईत  पेट्रोलचे आजचे दर ८२.१० रूपये प्रती लिटर आहे.  तर डिझेल ७२.०३ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः ७८.९९रूपये आणि ७७.०५ प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः ७१.६४ रूपये  आणि ६९.२३ रूपये प्रती लिटर आहे.