हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारात (Petrol Diesel Price Today) कच्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर झाला आहे. तब्बल 3 महिन्यानंतर अनेक राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच सर्वसामान्य जनतेला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार, (Petrol Diesel Price Today) महाराष्ट्रात आज पेट्रोलच्या किमतीमध्ये 57 पैशांची घसरण झाली असून आजचा पेट्रोलचा दर 105.96 रुपये प्रति लिटर झाला. तर डिझेलच्या किमतीतही 54 पैशांनी घट झाली असून 1 लिटर डिझेलचा भाव 92.49 रुपये आहे. आपल्या शेजारी राज्य असलेल्या मध्यप्रदेशात पेट्रोल 30 पैशांची स्वस्त झाले. असून त्याठिकाणी पेट्रोलचा भाव 109.70 रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेलमध्ये 28 पैशांनी घसरण होऊन 94.89 रुपये प्रति लिटर भाव झाला आहे.