हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल डिझेलच्या किमती जाहीर केल्या जातात. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे तर पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आहे आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. WTI फेब्रुवारी फ्युचर्स प्रति बॅरल $71.89 वर गेले आहेत. तर, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $76.91 वर आहे. एकीकडे आंतराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमतीत दरवाढ होउनही सलग 205 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन दरानुसार कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर आहे. लखनौमध्ये पेट्रोलचा दर 96.57 रुपये आणि डिझेलचा दर 89.76 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. फरिदाबादमध्ये पेट्रोल 97.45 रुपये आणि डिझेल 90.31 रुपये आहे. गोरखपूरमध्ये पेट्रोल ९६.७६ रुपये आणि डिझेल ८९.९४ रुपये आहे.
SMS द्वारे चेक करा पेट्रोल डिझेलच्या किंमती-
तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक ९२२४९९२२४९ वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३१११२२२२ वर आरएसपी एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 क्रमांकावर HPPprice पाठवून देखील शोधू शकतात.