Petrol Diesel Price। महागाई म्हंटल कि लोकांच्या अंगावर काटे उभे राहतात. या महागाईचा परिणाम लोकांच्या जीवनमानावर होताना दिसतो . गेल्या काही वर्षांपासून भारतातील सर्वसामान्य जनता महागाईच्या कचाट्यात सापडली आहे. या महागाईमुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला टेकल्या असून, त्यामध्ये खाद्यपदार्थ, एलपीजी गॅस, डाळी, भाजीपाला आणि सीएनजीचा समावेश असल्याचे दिसून येते. आता येत्या काही दिवसातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे… पेट्रोल- डिझेलच्या किमती का वाढू शकतात याची कारणे आज आपण जाणून घेणार आहोत.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ – Petrol Diesel Price
मध्यपूर्व देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे आणि रशिया-इराण यांच्यावर लादलेल्या युरोपियन युनियनच्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती 6% ने वाढल्या असून पुढील काळात त्यात अधिक वाढ होण्याचा इशारा दिला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती –
अमेरिकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयामुळे कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे, तर चीननेही तेलाच्या आयातीमध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे टेंशन वाढले आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाला फटका –
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील (Petrol Diesel Price) वाढ हि फक्त त्या क्षेत्रापुरती मर्यादित न राहता , याचा परिणाम इतर क्षेत्रावरही होताना दिसणार आहे. या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष किंमत वाढीचा परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे. तज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होण्यास काही महिने लागू शकतात. तोपर्यंत भारतात इंधन दर वाढले तर महागाई आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. आगामी काळात कच्च्या तेलाचा तुटवडा आणि वाढत्या किमतींमुळे भारतातील जनतेला अधिक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.