नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्या आपला तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत आहेत. बुधवारीही पेट्रोलचे दर प्रतिलिटर 80-85 पैशांनी तर डिझेलचे दर 70-75 पैशांनी वाढले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी आज देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 80 पैशांनी महागले असून 101 रुपयांच्या पुढे गेले आहे. मुंबईत पुन्हा एकदा लिटरमागे 85 पैशांची वाढ झाली आहे.
चारही महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 92.27 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 115.88 रुपये आणि डिझेल 100.10 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 106.69 रुपये आणि डिझेल 96.76 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 110.52 रुपये आणि डिझेल 95.42 रुपये प्रति लिटर
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जारी केले जातात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही आजचे नवीन दर याप्रमाणे जाणून घेऊ शकता
तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP असे लिहून 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.