Petrol Price: येथे एक लिटर पेट्रोल मिळते आहे फक्त 1 रुपये 46 पैशांमध्ये, यामागील कारणे काय आहेत ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्याच्या दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो आहे. भारतात तर पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या देशाच्या बर्‍याच भागांत एक लिटर पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. पण जगातील अनेक देशांमध्ये मात्र पेट्रोलचे दर वेगवेगळे आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की, तुम्हाला जगात सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल कोठे मिळेल? असे कोणते देश आहे जेथे त्याची किंमत भारतापेक्षाही जास्त आहे आणि शेजारच्या देशांमध्ये त्याच्या किंमती काय आहेत? चला तर तर मग जाणून घेऊयात की, जगातील प्रमुख देशांमध्ये पेट्रोलच्या किंमती काय आहेत –

स्वस्त पेट्रोल कोठे मिळेल?
पेट्रोलच्या किंमतींबद्दल बोलताना, व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळत आहे. तेथे एक लिटर पेट्रोलची किंमत 1.46 रुपये आहे. दुसर्‍या क्रमांकावर इराण आला आहे जेथे त्याची किंमत 4.24 रुपये आहे, अंगोलामध्ये पेट्रोल 17.88 रुपये आहे. हे तीन देश असे आहेत जिथे पेट्रोलचा दर पाण्यापेक्षा स्वस्त आहे. जर आपण बाजारात एक लिटर पाण्याची बाटली विकत घेतली तर ती 20 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

व्हेनेझुएला हा असा देश आहे जिथे जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल उपलब्ध आहे. आर्थिक संकटाला तोंड देणार्‍या व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल इतके स्वस्त आहे, कारण व्हेनेझुएला पृथ्वीवर सर्वात जास्त तेलाचा साठा असणारा देश आहे. या देशाची आर्थिक स्थिती ढासळल्यानंतरही इथले सरकार इंधनावर अनुदान देते आहे.

सर्वात महाग पेट्रोल कोठे विकले जाते आहे ?
http://globalpetroldieselprice.com या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार पेट्रोलच्या सर्वात महागड्या दराविषयी बोलताना हाँगकाँगमध्ये ते प्रति लिटर 169.21 रुपये, सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिकमध्ये 150.29 रुपये, सीरियात 149.08 रुपये, नेदरलँडमध्ये 140.90 रुपये आहेत, नॉर्वेमध्ये 135.38 रुपये आणि फिनलँडमध्ये ते 133.90 रुपये आहे. इंग्लंडमध्ये पेट्रोल 116 रुपये, स्वित्झर्लंडमध्ये 115 रुपये, जर्मनीमध्ये 116 रुपये, जपानमध्ये 93.62 रुपये, ऑस्ट्रेलियामध्ये 68.91 रुपये आणि अमेरिकेत 50.13 रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोल सर्वात महाग असलेल्या देशांमध्ये भारत 58 व्या स्थानावर आहे.

Leave a Comment