नवी दिल्ली । जर तुम्हीही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) आपल्या खातेधारकांना अनेक सुविधा पुरवते, परंतु या सुविधांचा लाभ घेण्यासाठी PF खातेधारकांना काही नियमांचे पालन करावे लागते. EPF आणि EPS च्या बाबतीतही नॉमिनेशन केले पाहिजे जेणेकरून EPFO सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास हा फंड नॉमिनी व्यक्तीला वेळेत उपलब्ध होऊ शकेल.
7 लाख रुपयांची सुविधा मिळवा
EPFO सदस्यांना एम्प्लॉई डिपॉझिट्स लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत इन्शुरन्स कव्हरची सुविधा देखील मिळते. यामध्ये नॉमिनी व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर दिले जाते. जर सदस्य कोणत्याही नॉमिनेशन शिवाय मरण पावला तर क्लेमवर प्रक्रिया करणे अवघड होते. आपण ऑनलाइन माध्यमातून नॉमिनेशन डिटेल्स कसा भरू शकता ते जाणून घ्या.
File e-Nomination today to ensure #SocialSecurity for your family/nominee. Members will have to submit certain required documents to nominate there family members/nominee.#EPFO #EPF #Employee pic.twitter.com/N3RwWNCzAO
— EPFO (@socialepfo) September 29, 2021
E- nomination सुविधाही सुरू झाली
EPFO ने आता नॉमिनी व्यक्तीची माहिती देण्यासाठी E- nomination सुविधा सुरू केली आहे. ज्यांची यामध्ये नावनोंदणी नाही त्यांना देखील संधी दिली जात आहे. नॉमिनी व्यक्तीचे नाव या माहितीनंतर, जन्मतारीख ऑनलाइन अपडेट केली जाईल.
EPF/EPS मध्ये E- nomination कसे करावे ?
EPFO वेबसाइटवर जा आणि ‘Service’ विभागात ‘For Employees’ वर क्लिक करा.
आता ‘Member UAN/Online Service (OCS/OTCP)’ वर क्लिक करा.
आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
‘Manage’ टॅबमध्ये ‘E- nomination’ निवडा.
यानंतर स्क्रीनवर ‘Provide Details’ टॅब दिसेल, ‘Save’ वर क्लिक करा.
फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी ‘Yes’ वर क्लिक करा.
आता ‘Add Family Details’ वर क्लिक करा. एकापेक्षा जास्त नॉमिनेशन जोडले जाऊ शकतात.
कोणत्या नॉमिनी व्यक्तीचा हिस्सा येईल याची घोषणा करण्यासाठी ‘Nomini Details’ वर क्लिक करा. डिटेल्स एंटर केल्यानंतर, ‘Save EPF nomination’ वर क्लिक करा.
OTP जनरेट करण्यासाठी ‘eSign’ वर क्लिक करा. आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
OTP दिलेल्या जागेत टाकून सबमिट करा.