नवी दिल्ली । जर तुम्ही EPFO खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO डिपार्टमेंटने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या अंतर्गत, EPFO ने आपल्या खातेदारांना EPF खात्यातून LIC चा प्रीमियम भरण्याची सुविधा देखील दिली आहे. वास्तविक, कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत नियमातील या बदलामुळे जनतेला थोडा दिलासा मिळणार आहे.
पैसे काढण्याची प्रक्रिया आणि पैसे काढण्यासाठीच्या अटी जाणून घ्या
PF असो वा LIC प्रीमियम असो, खातेदारांना EPFO च्या काही नवीन अटींचे पालन करावे लागेल. पहिली अट म्हणजे तुम्हाला EPFO चा फॉर्म 14 सबमिट करावा लागेल. यानंतर, LIC ची पॉलिसी आणि EPFO खाते एकमेकांशी जोडले जातील. अशा प्रकारे खातेदार LIC चा प्रीमियम भरण्यास सक्षम असेल.
दुसरी अट अशी आहे की, जेव्हा तुम्ही EPFO चा फॉर्म 14 भरत असाल, तेव्हा तुमच्या खात्यात किमान दोन महिन्यांच्या प्रीमियमची रक्कम असली पाहिजे. तिसरी अट म्हणजे EPFO ने ही सुविधा खातेदारांना फक्त LIC च्या पॉलिसीसाठीच दिली आहे. ही सुविधा इतर कंपन्यांसाठी उपलब्ध नाही. खातेदार इतर कोणत्याही पॉलिसीमध्ये EPF खात्यातून पैसे जमा करू शकणार नाहीत.
EPFO ने आणखी एक मोठा बदल केला आहे.
EPFO च्या नवीन नियमांनुसार, जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर EPFO तुम्हाला PF मधून एक लाख रुपये काढण्याची परवानगी देईल. यासाठी तुम्हाला कोणतीही कागदपत्रे देण्याचीही गरज भासणार नाही.