नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 24.07 कोटी खात्यांमध्ये 8.50 टक्के दराने व्याज जमा केले आहे. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की,”2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 24.07 कोटी लोकांच्या खात्यात 8.50 टक्के दराने पैसे ट्रान्सफर केले आहेत. तुमच्या PF खात्यात पैसे आले की नाही हे पाहायचं असेल तर तुम्ही या मार्गांनी लगेच पाहू शकता.
अशा प्रकारे तुमचा PF बॅलन्स जाणून घ्या
SMS द्वारे PF वरील रजिस्टर्ड मोबाइल नंबर वरून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) असा मेसेज करावा लागेल. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM लिहायचे आहे. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल.
मिस कॉलद्वारे
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची EPF बॅलन्स देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011 22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.
वेबसाइट द्वारे
तुमचा बॅलन्स ऑनलाइन तपासण्यासाठी, EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही बॅलन्स पाहू शकता.
UMANG APP द्वारे
जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही जेव्हा हवे तेव्हा App द्वारे तुमची EPF बॅलन्स तपासू शकता. यासाठी UMANG APP ओपन करा आणि EPFO वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल. ते एंटर केल्यानंतर, आपण EPF बॅलन्स पाहू शकता.