मोदी, पवार, फडणवीसांनंतर आता तुझा नंबर; भाजप आमदाराला PFI ची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पीएफआय या संघटनेने सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख पत्र पाठवत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे,आणि अजित पवार आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये असून त्यांच्यानंतर आता तुझा नंबर आहे अशी थेट धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. यांनतर देशमुख यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

मोहम्मद शफी बिराजदार या सोलापुरातील एका व्यक्तीने स्वहस्ते लिखित पत्र पाठवलं आहे. तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहे. ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. आम्ही मुसलमान आहोत, पीएफआयवर बंदी आणून तुम्ही चुकीचे काम केले. तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. यापूर्वी सीमीवरदेखील बंदी आणली होती त्याचे काय झाले ? फेल गेले. तुम्ही पीएफआयवर लाख वेळा बंदी घाला तरीही आम्ही फिनिक्सप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ.

तुम्ही आमच्यासारख्या विषारी सापाच्या शेपटीवर पाय टाकलाय. आता आमची मुले गप्प बसणार नाहीत. आता घराघरात कसाब, अफजल गुरु, याकूब जन्माला येतील असा थेट इशारा या पत्रातून विजयकुमार देशमुख याना दिला आहे. यानंतर विजयकुमार देशमुख यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.