सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो म्हणत हातचलाखी करणाऱ्या 2 बिहारींना अटक

0
123
Crime News police Phaltan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणत बिहारमधील दोन जणांनी अनेक महिलांची दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना फलटण तालुक्यात घडली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी दोघा सराईत चोरट्याने गुणवरे (ता. फलटण) येथून अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सुबोध प्रताप शहा व अबोध प्रताप शहा (रा. पंछगंछिया, जि. भागलपूर, बिहार) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुधेबावी (ता. फलटण) येथील एका महिलेला दागिन्‍यांना पॉलिश करून देतो, असे सांगत हातचलाखीने तिचे 45 हजार रुपयांचे मंगळसूत्र व गंठण व दागिने लांबविल्याचा गुन्हा दि. 6 मार्च 2023 रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. महिलेच्या फिर्यादीनंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासकार्य राबविले.

पोलिसांनी तपास करत संबंधित दोघा संशयितांना गुणवरे येथील मार्केट यार्डमधून ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्यांनी फसवणूक केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून दुधेबावी येथील महिलेचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण सव्वा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

संबंधित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर परांडा, कळंब पोलिस ठाणे येथेही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तसेच त्यांनी महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यातही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधिकारी बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार व पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, पोलिस हवालदार साबळे, पोलिस नाईक अभिजित काशीद, अमोल जगदाळे, धराडे, पोलिस कॉन्‍स्‍टेबल महेश जगदाळे, सचिन पाटोळे, निखिल गायकवाड, तुषार नलवडे व पोलिस नाईक राणी गळवे यांनी केली आहे.