मुंबईतील ताज हाॅटेल मध्ये अतिरेकी AK47 घेऊन घुसत असल्याचा फोन कराडमधून; ATS चे पथक कराड येथे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये दोन अतिरेकी AK47 घेऊन घुसत असल्याच्या फोनने शनिवारी एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. आता या घटनेचे कराड कनेक्शन उघड झालय. कराड येथील एका अल्पवयीन मुलानं चित्रपट पाहून गम्मत म्हणून असा फोन केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत शोध घेण्यासाठी एटीएस पथक कराड शहरात दाखल झाले आहे.

मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये पाठीमागच्या गेटमधुन दोन अतिरेकी एके फोर्टी सेव्हन रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती फोनवरून देणाऱ्या अल्पवयीन मुलाची कराड शहर पोलिसांनी नातेवाईकांसह चौकशी केली. यावेळी त्याने गंमत म्हणून हा प्रकार केल्याचे सांगितले. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेची प्रचंड पळापळ झाली.

ताज हाॅटेलमध्ये दहशतवादी AK47 घेऊन घुसल्याचा तो फोन कराड येथून; नक्की काय आहे प्रकरण जाणुन घ्या

याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले की कराड मधील एका नववीत शिकणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंबई येथील हाॅटल ताज मधील रिसेप्शन काउंटरला फोन केला. हॉटेलमध्ये फोन उचलल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलाने ताजमहाल हॉटेलच्या पाठीमागील गेटमधुन दोन अतिरेकी एके फोर्टी सेव्हन रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखा व बंदोबस्त वाढवावा असे सांगितले. याबाबतची माहिती कुलाबा पोलिसांनी त्वरित कराड पोलिसांना सांगितली. कराड शहर पोलिसांनी ज्या नंबर वरून फोन करण्यात आला त्या नंबर वरून संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता तो फोन नंबर मुलगा वापरत असल्याचे संबंधितांनी सांगितली.

दरम्यान, मुलगा इयत्ता नववी मध्ये शिकत असून 14 वर्षाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांसमोरच संबंधित मुलाकडे चौकशी केली असता त्याने गंमत म्हणून फोन केल्याचे सांगितले. तसेच शुटाऊट वडाळा, 26 ,11 यासारखे चित्रपट बघितल्याने त्याचा प्रभाव असल्याचेही सांगितले. दरम्यान प्रथम दर्शनी केलेल्या चौकशीमध्ये संबंधित अल्पवयीन मुलाचा समाज विघातक घटनांशी कुठलीही संबंध असल्याचे दिसून येत नाही. संबंधित मुलाने गंमत म्हणून हा फोन केल्याचे दिसून येत आहे. तरीही याची सखोल चौकशी करून काही आक्षेपार्ह आढळल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment