Monday, January 30, 2023

फोन टॅपिंग प्रकरण: पटोलेंच्या आरोपांनंतर सरकारकडून ३ सदस्यीय समिती स्थापन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना म्हंटल होत की आपला फोन अनिष्ट राजकीय हेतून गैरपद्धतीने टॅप केला जात आहे. केवळ आपलाच नाही तर इतर राजकीय नेत्यांचेही फोन टॅप केले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच चौकशीची मागणी केली होती. पटोलेंच्या या मागणीनंतर सरकार कडून फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. चौकशीनंतर तीन महिन्यात अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीतील फोन टॅपिंग प्रकरणाची ही चौकशी आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करण्यासाठी विशिष्ठ कायद्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागते. फोन नंबर द्यावे लागतात. मात्र दुसऱ्याच व्यक्तीचे नाव देऊन नाना पटोले यांचा फोन टॅप झाला असेल तर याची चौकशी होणे गरजेचे आहे,’ असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.