हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB Factcheck : आपल्या देशातील मुली आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सोशल मीडियावर या योजनांबाबत अनेकदा चुकीच्या बातम्याही व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री क्रेडिट योजने’ अंतर्गत सर्व आधार कार्डधारकांच्या खात्यात 80,000 रुपये रोख रक्कम देत असल्याचा दावा केला जातो आहे. जर आधार कार्डशी संबंधित हा व्हिडीओ आपल्याकडेही आला असेल तर फसवणूक टाळण्यासाठी योग्य माहिती घेऊन सावधगिरी बाळगा.
'Sarkari Update' नामक #Youtube चैनल के एक वीडियो में दावा किया गया है कि केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री क्रेडिट योजना’ के तहत सभी आधार कार्ड धारकों के खाते मे ₹80,000 की नकद राशि दे रही है#PIBFactCheck:
▶️ यह दावा फर्जी है
▶️ केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है pic.twitter.com/rbuCtLKs8w
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 28, 2022
या व्हायरल मेसेजबाबत जाणून घ्या
‘सरकारी अपडेट’ नावाच्या एका यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की,” केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री क्रेडिट योजना’ चालवत आहे आणि या योजनेअंतर्गत सर्व आधार कार्डधारकांना त्यांच्या खात्यात 80,000 रुपये दिले जात आहेत.” या व्हिडिओमध्ये असेही म्हटले गेले आहे की,”भारतातील सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.” या व्हिडिओमध्ये पुढे असेही म्हटले गेले आहे की,” या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 62 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.” यासोबतच या व्हिडिओमध्ये लोकांना कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या राज्याचे नाव देखील सांगण्यास सांगितले जात आहे. PIB Factcheck
सरकारने मेसेज फेक असल्याचे सांगितले
PIB Factcheck या सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. PIB Factcheck च्या ट्विटमध्ये हा दावा खोटा असल्याचे सांगत केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे म्हटले गेले आहे.
अशा प्रकारे तथ्य तपासा
जर आपल्याकडेही असा एखादा मेसेज आला असेल तर तो PIB Factcheck कडे तपासणीसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा WhatsApp नंबर +918799711259 किंवा ईमेल: [email protected] वर पाठवू शकता. ही माहिती PIB वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.
हे पण वाचा :
Business Idea : हिवाळ्यात अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचा व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
DCB Bank कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 8.25% पर्यंत व्याज
Stock Market : बुल अन् बेअर मार्केट म्हणजे काय ??? यादरम्यान गुंतवणूकदारांनी काय करावे ते जाणून घ्या
Gold Loan : गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन सुविधा म्हणजे काय ??? त्याचे फायदे अन् जोखीम समजून घ्या
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ, जाणून घ्या संपूर्ण आठवड्यातील सराफा बाजाराची स्थिती