उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीवर आरोप करण्यात आला कि, या व्यक्तीने कौटुंबीक वादानंतर त्याची पत्नी आणि मेहुणी कॉलगर्ल असल्याचे सांगितले. याबरोबर त्याने त्यांचे फोटो सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअऱ केले. या महिलेने मेरठच्या मुंडालीमध्ये तक्रार दाखल करून पतीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात आरोपी आणि त्याची बायको यांच्यात लग्न झाल्यापासून वाद होता. त्यामुळे हि महिला ऑक्टोबर २०१९ पासून आपल्या वडिलांच्या घरी राहत होती. या महिलेने व तिच्या माहेरच्यांनी पती हुंड्याची मागणी करत होता आणि मारहाणही करत होता. ज्याला वैतागून ती वडिलांकडे रहायला गेली होती असा आरोप केला आहे.
या महिलेने आपल्या तक्रारीत तिच्या पतीने तिचे आणि तिच्या लहान बहिणीचे फोटो त्या कॉलगर्ल असल्याचे सांगत सोशल मीडियावर शेअर केले. एवढेच नाहीतर त्याने दोघींचे मोबाइल नंबरही सोशल मीडियावर फोटोसोबत शेअऱ केले आहेत असा आरोप केला आहे. तसेच महिला पुढे म्हणाली,तिच्या पतीवर काहीच कारवाई होत नाही आहे. आरोपी बऱ्याच महिन्यांपासून त्रास देत आहे. तो चार महिन्यांपासून असे करत आहे. या दोघी बहिणींना रोज वेगवेगळ्या नंबरवरून लोकांचे फोन येतात. यामुळे या दोघी खूप हैराण झाले आहेत. अजराडा गावातील सोनू नावाच्या व्यक्तीचा पत्नीसोबत वाद सुरू आहे. त्याने पत्नी आणि पत्नीच्या परिवाराविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे त्याची चौकशी सुरु आहे. सध्या चौकशी सुरु असून नंतर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती सीओ किठौर बृजेश सिंह यांनी दिली आहे.
अशाप्रकारची हि पहिलीच घटना नसून याअगोदरदेखील अशा घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्ये पती आणि पत्नीने एकमेकांना ब्लॅकमेल केले आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या पटियालामध्ये आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत असलेल्या महिलेने आपल्या पतीविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. ती महिला म्हणाली कि,माझ्यासोबत पतीने दुसरे लग्न केले होते. सासरी लोक चांगले वागत नसल्याने ती बऱ्याच महिन्यांपासून माहेरीच राहत असे. हे या महिलेच्या पतीला मान्य नव्हते. यानंतर या महिलेच्या पतीने पत्नीला बदनाम करण्यासाठी तिच्या नावाने एक फेसबुक अकाउंट सुरू केले. त्यानंतर पत्नीच्या माहेरी आजूबाजूला राहत असलेल्या लोकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली आणि त्या प्रोफाइलवर आक्षेपार्ह फोटो शेअर केले असा आरोप या महिलेने आपल्या पतीवर केला होता.