मुंबई । अभिनेता सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही विरुद्ध सोशल मीडियापासून बॉलीवूडच्या आतूनही आवाज उठत आहेत. बॉलीवूडमधील बड्या घराण्यातून आलेल्या स्टार किड्सवर रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान गायक सोनू निगमने देखील घराणेशाहीवर बोट ठेवलं होतं. सुशांतप्रमाणे आणखी काही तरुण कलाकार आत्महत्या करतील अशी भीती त्याने व्यक्त केली होती. त्याच्या या वक्तव्याला गायक कुमार सानू यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. सर्वाधिक घराणेशाही बॉलिवूडमध्येच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
https://www.facebook.com/legend.sanuda/videos/4267501636601095/
कुमार सानू यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “सुशांत एक उत्तम अभिनेता होता. खूप कमी कालावधीत त्याने यश संपादीत केलं. अशा गुणी कलाकाराने आत्महत्या करणं दुदैव आहे. खरं तर घराणेशाही सर्वच क्षेत्रांमध्ये दिसते. परंतु त्याचा सर्वाधिक प्रभाव बॉलिवूडवर आहे हे नाकारता येणार आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूडमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या नव्या कलाकारांनी सर्वप्रथम एखादी नोकरी पकडावी त्यानंतर आपल्या स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण करावे.” असा सल्ला त्यांनी या व्हिडीओद्वारे नव्या कलाकारांना दिला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”