हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Awas Yojana : केंद्र सरकार कडून प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) चा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यानंतर आता ही योजना 31 डिसेंबर 2024 पर्यंत लागू असेल. यामध्ये 31 मार्च 2022 पर्यंत मंजूर झालेल्या 122.69 लाख घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीचाही समावेश आहे. हे लक्षात घ्या कि, देशातील सर्व लोकांना पक्की घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) सुरू करण्यात आली आहे.
एका मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिलेल्या बातमीमधील, सरकारी निवेदनानुसार, मूळ अंदाजित मागणीनुसार 102 लाख घरांच्या बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 62 लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र एकूण मंजूर झालेल्या 123 लाख घरांपैकी 40 लाख घरांचे प्रस्ताव राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून उशिरा मिळाले, ज्यांना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागेल. म्हणून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विनंतीच्या आधारे, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून PMAY-U च्या अंमलबजावणीचा कालावधी 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. PM Awas Yojana
2015 मध्ये सुरू झाली ही योजना
हे लक्षात घ्या कि, 25 जून 2015 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. सर्व पात्र शहरी कुटुंबांना पक्की घरे सुनिश्चित करून झोपडपट्टीतील रहिवाशांसह EWS/LIG आणि MIG श्रेणींमधील शहरी घरांची कमतरता भरून काढणे हे या अभियाना मागचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत 2017 मध्ये अंदाजे 100 लाख घरांची मागणी होती. PM Awas Yojana
कोण-कोण पात्र असेल ???
3 लाख ते 18 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले कोणतेही कुटुंब. अर्जदार किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर नसावे. 18 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्ती, ज्यांच्याकडे आधीच स्वतःचे पक्के घर आहे किंवा ज्यांना यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने चालवलेल्या गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळाला आहे, ते प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. PM Awas Yojana
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmaymis.gov.in/
हे पण वाचा :
‘या’ कार्डच्या साहाय्याने Flipkart वर मिळवा 12% पर्यंतचा कॅशबॅक !!!
Paytm कडून ग्राहकांना धक्का !!! आता वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महागले
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 15 वर्षात दिला 18110% रिटर्न !!!
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर पहा
Har Ghar Tiranga Yojana : टपाल विभागाने वितरित केले 1 कोटींहून जास्त राष्ट्रध्वज !!!