Fact Check : भारत सरकार देतंय 20 लाख रुपये? Viral मेसेज मागील सत्य जाणून घ्या

Money
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलत्या काळानुसार भारतात डिजिटलायझेशन खूप वेगाने वाढले आहे (PM Awas Yojana). आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन असतो. याद्वारे अवघ्या दोन मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणं यामुळे शक्य झालं आहे. मात्र वाढत्या डिजिटायझेशनसोबतच सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या योजनांच्या नावाने लोकांना एसएमएस किंवा ईमेल पाठवतात. यानंतर, ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरणे आणि त्यांची खाती रिकामी करणे अशी प्रकरणे घडताना दिसत आहेत.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1527928560543236097

सध्या सोशल मीडियावर पीएम आवास योजनेच्या नावाने एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, भारत सरकारने पीएम आवास योजनेअंतर्गत प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. सबका विकास महा क्विझ असे या क्विझचे नाव आहे. या व्हायरल मेसेजची सत्यता शोधण्यासाठी आणि लोकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांपासून रोखण्यासाठी PIB स्वतः Fact Check करते. या व्हायरल मेसेजची फॅक्ट चेकही करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या मेसेजमागील सत्यता. PM Awas Yojana

पीआयबीने त्यांच्या ट्विटर हँडलवर या संदेशाची सत्यता तपासली आहे. या व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार पीएम आवास योजनेअंतर्गत सबका विकास महा क्विझचे आयोजन करत आहे. या प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.

काय आहे सत्य? PM Awas Yojana

पीआयबीने या व्हायरल मेसेजची सत्यता तपासली आणि सांगितले की हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा आहे. भारत सरकार पीएम आवास योजनेच्या नावाने कोणत्याही प्रकारची प्रश्नमंजुषा आयोजित करत नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांना बळी पडू नये, असा इशारा पीआयबीने दिला आहे. हे संदेश सायबर गुन्हेगार पाठवतात. त्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचे वैयक्तिक आणि बँकिंग तपशील पाठवू नका. असे केल्याने तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. तुमचे बँक खाते क्षणार्धात रिकामे होऊ शकते.