हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM KISAN : केंद्र सरकार कडून 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता नुकताच पाठवण्यात आला आहे. सरकार कडून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये पाठवले जातात. दर 4 महिन्यांनी 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये ही रक्कम पाठवली जाते. सरकारने आतापर्यन्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत पाठवली आहे.
31 मे रोजी केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता पाठवला गेला. मात्र, एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ना पाठवता हळूहळू पाठविले जात आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्यालाही पैसे मिळाले नसतील तर जरा वाट पहा. यामागे काही कारणे असू शकतील. चला तर मग त्याविषयी जाणून घेयूयात… PM KISAN
हे लक्षात घ्या कि, संस्थात्मक शेतकरी तसेच आपल्या घरातील कोणीतरी सरकारी नोकरी करत असेल तसेच ज्यांची पेन्शन 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा इन्कम टॅक्स भरणारी लोकं याशिवाय, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधानपरिषदेचे माजी किंवा सध्याचे सदस्य देखील या योजनेसाठी पात्र नाहीत. यांना 11 वा हप्ता मिळणार नाही. PM KISAN
जर आपण वर नमूद केलेल्यापैकी कोणत्याही श्रेणीत येत नसाल तर तुम्हांला हप्त्याचे स्टेट्स घरबसल्या स्वतः तपासता येईल. यासाठी तुम्हाला पीएम किसानचे अधिकृत पोर्टल http://www.pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. इथे गेल्यावर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल. त्यावर क्लिक करा आणि Beneficial Status चा पर्याय निवडा. त्यानंतर 12 अंकी आधार नंबर टाका आणि Get Data वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या हप्त्याचे स्टेट्स दिसून येईल. जर पैसे मिळाले नसतील तर टोल फ्री हेल्पलाइनचीही मदत घेता येईल.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात असे तुम्हांला वाटत असेल तर त्यासाठी PM किसानच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करून याचा लाभ घेता येऊ शकेल. यासाठी तुम्हाला फार्मर्स कॉर्नरवर जाऊन एका फॉर्म भरावा लागेल. PM KISAN
हे पण वाचा :
Bank FD : जास्त व्याज मिळवण्यासाठी पालकांच्या नावाने सुरु करा FD !!!
EPFO : आता घरबसल्या अशा प्रकारे चेक करा PF बॅलन्स
Investment : अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!
Sologamy : मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Multibagger Stock : गेल्या सहा महिन्यांत ‘या’ शेअर्समध्ये झाली 645 टक्क्यांची जोरदार वाढ !!!