PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर… अशा प्रकारे करा तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली. हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारने नुकतेच या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 12 व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेच्या 12व्या हप्त्यांतर्गत शेतकऱ्यांना 16,000 कोटी रुपये जारी केले आहेत.

याआधी 31 मे 2022 रोजी PM Kisan च्या 11 व्या हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आणि आता 12 व्या हप्त्याचे देखील पैसे सर्व लाभार्थ्यांना ट्रान्सफर करण्यात आले आहेत. मात्र जर आपल्याला या 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले नसतील तर यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

छत्तीसगढ़ ने पीएम-किसान में लंबित ई-केवाईसी कार्य 31 अगस्त के बाद भी जारी रखने का किया अनुरोध

हप्ता थांबवण्यामागील कारणे जाणून घ्या ???

PM Kisan योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करताना एखादी माहिती, चुकीचा पत्ता किंवा बँक खात्याची माहिती भरण्यात चूक झाली असेल तरीही हप्ता मिळणार नाही.

राज्य सरकारकडून दुरुस्ती प्रलंबित असल्यास पैसे मिळणार नाहीत.

NPCI मध्ये आधार सीडिंग नसले तरीही PM किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत, पब्लिक फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टीम (PFMS) रेकॉर्ड स्वीकारत नाही.

बँकेची रक्कम इनव्हॅलिड असेल तरीही योजनेचे पैसे येणार नाहीत.

PM-KISAN 10th instalment: THESE mistakes could spell trouble for your money, rectify it or else Rs 2,000 won't be transferred into your a/c | Personal Finance News | Zee News

अशा प्रकारे तपासा

आपल्याकडून भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी PM Kisan सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

सर्वांत आधी http://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
उजव्या बाजूला Farmers Corner असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर बेनिफिशियरी स्‍टेटस वर क्लिक करा.
यानंतर आधार नंबर, खाते क्रमांक आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल.
आधार नंबर टाका आणि GATT डेटावर क्लिक करा.
यांनतर आपली सर्व माहिती आणि पीएम किसानच्या हप्त्यांचे तपशील समोर दिसतील.
इथे आपण दिलेली सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते तपासा.

यहाँ देखे- Pm Kisan Application Status Pmkisan.gov.in

अशाप्रकारे करा तक्रार

मात्र जर आपण दिलेली सर्व माहिती बरोबर असूनही बँक खात्यात पैसे आले नाहीत तर हेल्पलाइन डेस्कची मदत घेता येईल.

यासाठी टोल फ्री नंबर 011-24300606 आणि हेल्पलाइन नंबर 155261 वर कॉल करून तक्रार नोंदवता येईल.

तसेच http://[email protected] या ई-मेल आयडीवर ईमेल द्वारे तक्रार नोंदवून मदत मिळवता येईल.

Reference: मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; PM KISAN चा 12 वा हप्ता बँक खात्यात जमा

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 159 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने बचत खात्यावरील व्याजदर वाढवले
South Indian Bank कडूनही FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांमुळे सोने-चांदी महागले, आजचे नवे दर पहा
ICICI Bank ने वाढवले ​​FD वरील व्याजदर, आता ग्राहकांना मिळणार आधीपेक्षा जास्त फायदा