हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र हि रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 11 हप्ते देण्यात आले आहेत.
मात्र इथे हे जाणून घ्या कि, शेतजमीन असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेलच असे नाही. तसेच काही शेतकऱ्यांना या योजने बाहेरही ठेवण्यात आले आहे. मात्र असे असूनही अनेक शेतकरी पात्र नसतांनाही या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलण्यात येत आहे. त्याअंतर्गत अपात्र शेतकऱ्यांकडून या योजनेची रक्कमही परत घेण्यास सुरुवात झाली आहे. PM Kisan
ही लोकं पात्र नाहीत
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan) लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही नियम करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ ज्या लोकांना मिळू शकणार नाही लोकांची सरकारने एक लिस्टच तयार केली आहे. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
संस्थागत जमीनधारक, सरकारी शेतजमीन असलेले शेतकरी, ट्रस्ट फार्म आणि सहकारी शेततळे इ.
ज्यांच्या घरात पूर्वी किंवा सध्या घटनात्मक पद आहे अशी शेतकरी कुटुंबे.
केंद्र किंवा राज्य सरकारे, कार्यालये आणि विभागांचे सध्याचे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी.
केंद्र किंवा राज्य सार्वजनिक उपक्रम आणि केंद्राच्या अंतर्गत संलग्न कार्यालये किंवा स्वायत्त संस्थांचे वर्तमान किंवा माजी अधिकारी.
ते पेन्शनधारक, ज्यांना 10,000 रुपये किंवा त्याहून जास्त मासिक पेन्शन मिळते.
ज्यांनी मागील मूल्यांकन वर्षांमध्ये इन्कम टॅक्स भरला आहे.
इतर व्यावसायिक जसे की इंजिनिअर, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट आणि इतर व्यावसायिक संस्थांमध्ये रजिस्टर्ड असलेले व्यक्ती.
तसेच पती-पत्नी दोघे मिळून या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. PM Kisan
अशा प्रकारे पात्रता तपासा
जर आपण PM Kisan योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर हे काम ऑनलाइन सहजपणे करता येऊ शकेल. यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, वेबसाइटवरील ‘ऑनलाइन रिफंड’ पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा तुमचा बँक खाते क्रमांक टाकावा लागेल. हे सर्व केल्यानंतर ‘Submit’ या पर्यायावर क्लिक करा.
आता स्क्रीनवर ‘You are not eligible for any refund amount’ असा मेसेज दिसत असेल तर आपल्याला पैसे परत करण्याची गरज नाही. याचा अर्थ आपण या योजनेसाठी पात्र आहात. जर पात्र नसाल तर स्क्रीनवर रिफंड रकमेचा मेसेज मिळेल. PM Kisan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/
हे पण वाचा :
Richest Women in India : हजारो कोटींची संपत्ती असलेल्या देशातील 10 सर्वात श्रीमंत महिला !!!
George Floyd च्या हत्येप्रकरणी आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली शिक्षा !!!
Bank of Baroda च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा
भारतातील IT Industry मधील सर्वाधिक पगार घेणारे 5 सीईओ कोण आहेत ???