हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : PM Kisan च्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 हप्ते देण्यात आले आहेत. आता या योजनेचा 12वा हप्ता फक्त KYC करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाईल. कारण सरकारकडून PM किसानसाठी e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. KYC करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे. आता शेतकऱ्यांना घरबसल्या स्मार्टफोनवरून e-KYC करता येईल. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे देखील हे काम करता येईल.
हे लक्षात घ्या कि,PM Kisan योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एका वर्षात 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 31 मे रोजी या योजनेच्या 11व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात आली आहे.
अशा प्रकारे करा e-KYC ???
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत e-KYC करणे खूप सोपे आहे. दोन प्रकारे करता येते. आता शेतकऱ्यांना स्मार्टफोनवरून हे काम करता येईल. याशिवाय, शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊनही बायोमेट्रिक देऊन e-KYC करू शकतात PM Kisan
अशा प्रकारे घरबसल्या करा e-KYC –
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
येथे उजवीकडे फॉर्मर्स कॉर्नर दिसेल. त्याच्या खाली e-KYC लिंक असेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर जे पेज उघडेल त्यावर आधार क्रमांकाची माहिती द्या आणि सर्च टॅबवर क्लिक करा.
यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
त्यानंतर OTP टाका आणि सबमिट करा.
तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.
CSC ला भेट देऊन देखील e-KYC करता येईल
कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये PM Kisan लाभार्थी शेतकऱ्याची बायोमेट्रिक पद्धतीने e-KYC केले जात आहे. यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड आणि रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक असणेही आवश्यक आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरवर e-KYC साठी 17 फी लागेल. याशिवाय CSC ऑपरेटर 10 रुपये ते 20 रुपये सर्व्हिस चार्ज देखील घेतील. अशा प्रकारे, तुम्हाला CSC कडून e-KYC करण्यासाठी जवळपास 37 रुपयांपर्यंत खर्च येईल. PM Kisan
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट !!!
Gold Price Today : सोन्या- चांदीमध्ये आज घसरण !!! नवीन दर पहा
Kotak Mahindra Bank ने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Bank Strike : 27 जून रोजी बँक कर्मचारी पुकारणार संप, सलग 3 दिवस बँका राहणार बंद
Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही पेमेंट करता येणार !!!