हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : अनेक कामांची शेवटची तारीख 31 जुलै आहे. ज्यामुळे जुलै महिना हा खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण आहे. या महिन्यात ITR भरण्या सहित किसान सन्मान निधीसाठी KYC करण्यासारखी अनेक कामे पूर्ण करावी लागणार आहेत. आज आपण अशा 3 महत्त्वाच्या कामांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत जी 31 जुलैपर्यंत पूर्ण करावी लागतील.
किसान सन्मान निधीसाठी KYC
PM Kisan योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही या महिना अखेरपर्यंत KYC करावे लागेल. कारण e-KYC ची शेवटची तारीख 31 जुलैपर्यंत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे या तारखेपर्यंत e-KYC पूर्ण होणार नाही त्यांना पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. हे जाणून घ्या यासाठी e-KYC करण्याचे दोन मार्ग आहेत. यासाठी शेतकरी आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन e-KYC करू शकतात.
याशिवाय, PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटद्वारे देखील e-KYC प्रक्रिया ऑनलाइन करता येईल. मात्र यासाठी आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा. जर तो लिंक असेल तर आपल्याला घरबसल्या e-KYC करता येईल.
ITR फाइलिंगसाठी लेट फीस
हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. तसेच पर्सनल आणि पगारदार कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. मात्र या तारखेनंतर ITR भरण्यासाठी लेट फीस भरावी लागेल. यामध्ये ज्या प्राप्तिकरदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असेल त्याला लेट फीस म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. मात्र जर करदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5000 रुपये लेट फीस भरावी लागेल. PM Kisan
पीक विमा
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या पिकांचा विमा काढण्याची सुविधा दिली जाते. या अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. हे रजिस्ट्रेशन ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील केले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला जवळची बँक शाखा, सहकारी बँक लिमिटेड, सार्वजनिक सेवा केंद्र, अधिकृत विमा कंपनीशी संपर्क साधता येईल. त्याचबरोबर http://pmfby.gov.in वर जाऊन देखील ऑनलाइन अर्ज करता येईल. यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, ओळखपत्र (आधार, पॅन, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स) आणि बँक पासबुक आणावे लागेल. PM Kisan
हे पण वाचा :
SBI ग्राहकांसाठी खुशखबर, आता FD वर मिळणार जास्त व्याज !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, नवीन दर तपासा
FD Rates : आता ‘या’ NBFC कडून FD वरील व्याजदरात वाढ !!!