PM किसान योजनेचा हप्ता लवकरच होणार जमा; तत्पूर्वी करा हे काम, अन्यथा बसेल फटका

PM Kisan Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारत सरकारच्या योजनांमधील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आता या योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी देण्यात येणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीची पडताळणी करणे गरजेचे आहे.

शासनाने या योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी काही नियम अधिक कठोर केले आहेत. ई-केवायसी (e-KYC) आणि जमीन पडताळणी न केल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. सरकारने अशा लोकांना त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा त्यांना हप्ता दिला जाणार नाही.

महत्वाचे म्हणजे, या योजनेचा काही अपात्र व्यक्तींनी गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी सरकारला मिळाल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तपासणी प्रक्रिया अधिक काटेकोर केली आहे. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत, पण तरीही लाभ घेत आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे. त्यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांनीच लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

ई-केवायसी कसे करावे?

जर तुम्ही ई-केवायसी अद्याप केली नसेल, तर ती करण्यासाठी दोन पर्याय आहेत –

  1. ऑनलाइन पद्धत – प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्वतः ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल.
  2. ऑफलाइन पद्धत – सीएससी सेंटर (CSC Center) मध्ये जाऊन तुमचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून ई-केवायसी करता येईल.

दरम्यान, देशभरातील कोट्यवधी शेतकरी १९ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, ई-केवायसी आणि जमीन पडताळणी पूर्ण न केल्यास हा हप्ता बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय या योजनेचा लाभ मिळू शकेल.